शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: क्रेडिट सोसायटीत घुसून मारहाण; मनसेच्या शहराध्यक्षासह चौघांना अटक

By उद्धव गोडसे | Updated: August 6, 2024 14:25 IST

खंडणीसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, पोलिस कोठडीत रवानगी

कोल्हापूर : रंकाळा येथील श्री साईदर्शन जनता अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीत घुसून मनसेचे शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले, पदाधिकारी प्रसाद पाटील यांच्यासह समर्थ कशाळकर आणि विकास कांबळे यांनी तिघांना जातीवाचक शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. सोमवारी (दि. ५) दुपारी घडलेल्या प्रकारानंतर सोसायटीचे प्रमुख शुभम कृष्णात देशमुख (वय २५, मूळ रा. एकोंडी, ता. कागल, सध्या रा. कळंबा) यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी चारही संशयितांवर खंडणी, दरोडा आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केले.लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रंकाळा येथील क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून शुभम देशमुख आणि त्यांच्या सहका-यांनी कर्ज देण्याची जाहिरात करून गरजूंकडून पैसे घेतले. याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेले राजू दिंडोर्ले आणि इतरांनी फिर्यादी देशमुख यांच्यासह सोसायटीचे अध्यक्ष सचिन साबळे आणि उपाध्यक्ष सुरेश पाटील यांना बेदम मारहाण केली. कार्यालयाची तोडफोड करीत जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच कर्जाचे आमिष दाखवून काही लोकांकडून पैसे घेतल्याचे जबरदस्तीने लिहून घेतले. सीसीटीव्ही कॅमे-यांचा डीव्हीआर काढून लंपास केला. सोसायटीच्या पदाधिका-यांसह कर्मचा-यांना कार्यालयात कोंडून मारहाण सुरू असल्याचा प्रकार समजताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन देशमुख यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. 

त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी मध्यरात्रीच दिंडोर्ले याच्यासह चौघांना अटक केली. त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह दरोडा, दमदाटी, मारहाण, खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला.

समर्थकांची गर्दीदिंडोर्ले याला अटक झाल्याचे समजताच त्याच्या समर्थकांनी मंगळवारी दुपारी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केली. पोलिसांनी गर्दी हटवून चौघांना न्यायालयात हजर केले. दिंडोर्ले याने गेल्याच आठवड्यात पाकिटबंद खाद्य पदार्थांच्या दर्जावरून डी मार्टमध्ये गोंधळ घातला होता. याबाबत त्याच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीMNSमनसेPoliceपोलिस