शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: व्हॉटसॲप ग्रुपवर आक्षेपार्ह मजकूर; करनुरात तणाव, दगडफेकीत चौघे जखमी; पोलिस छावणीचे स्वरुप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 12:02 IST

गावात तणावाचे वातावरण

कागल : करनूर (ता. कागल) येथे व्हॉटसॲप ग्रुपवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याच्या कारणावरून काही तरुणांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन दोन गटांत दगडफेक झाली. यामध्ये चारजण किरकोळ जखमी, तर एका चारचाकीचे व दोन मोटरसायकलींचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मराठी शाळेजवळ घडली. याघटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोन्ही गटांतील ज्येष्ठ लोकांनी व पोलिसांनी दोन्ही बाजूच्या तरुणांना शांत केले. याप्रकरणी कागल पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पोलिस ठाण्याबाहेरही जमाव जमला होता.गावात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्हा पोलिसप्रमुख योगेशकुमार गुप्ता, पोलिस उपअधीक्षक धीरज कुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुजित क्षीरसागर, पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार, गंगाधर घावटे आदी उपस्थित होते.गावात एका व्हॉटस् ॲप ग्रुपवर सकाळी हा आक्षेपार्ह मजकूर प्रसारीत झाला होता. त्यावर वाद सुरू झाल्यानंतर ग्रुप अडमीनने मजकूर काढून टाकला. सायंकाळी वाद मिटविण्यासाठी एका घरात दोन गटातील मोजक्या व्यक्तींमध्ये चर्चा सुरु असतांना वाद वाढून हाणामारी झाली. याची माहिती वेगाने पसरून दोन गट जमाव करून मराठी शाळेजवळ एकमेकांसमोर आले. यावेळी धक्काबुक्की होऊन एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. यात चारजण जखमी झाले. तेथे उभा असलेल्या चारचाकी वाहनाच्या काचा फुटल्या. दुचाकी आडव्या पडल्या. पोलिसांनी घटनास्थळी येऊन जमावाला पांगविले आणि दोन्हीबाजूच्या लोकांशी चर्चा करून वातावरण शांत केले. मोठा पोलिस बंदोबस्त असल्याने गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : WhatsApp post sparks stone pelting, four injured in Kolhapur.

Web Summary : An offensive WhatsApp post led to clashes in Karnoor, Kolhapur. Stone pelting injured four and damaged vehicles. Police intervened, restoring calm with a heavy presence. Investigation underway.