दरोडोखोरांच्या टोळीतील चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 20:07 IST2017-09-15T20:05:55+5:302017-09-15T20:07:25+5:30

कोल्हापूर : उदगाव (ता. शिरोळ) येथे दरोडा टाकून महिलेचा खून करून साडेसात लाख किमतीचा ऐवज लंपास करणाºया चौघा दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली.

 Four gangs of gangsters were arrested | दरोडोखोरांच्या टोळीतील चौघांना अटक

दरोडोखोरांच्या टोळीतील चौघांना अटक

ठळक मुद्देअन्य साथीदार योगेश काळे, मन्या पवार, तळपापड्या काळ्या हे फरार अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : उदगाव (ता. शिरोळ) येथे दरोडा टाकून महिलेचा खून करून साडेसात लाख किमतीचा ऐवज लंपास करणाºया चौघा दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन दुचाकी, बारा तोळे सोन्याचे दागिने, हत्यारे असा सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अन्य तिघे साथीदार फरार आहेत. त्यांच्यावर कोल्हापूरसह सांगली, पुणे, अहमदनगर येथे जबरी चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

संशयित आरोपी आकाश नामदेव पवार ऊर्फ जाबाज उपकाºया पवार (वय २०, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, तासगांव, जि. सांगली), मैनेश झाजम्या पवार (३५, रा. इटकरे, ता. वाळवा, जि. सांगली), शेळक्या जुरब्या पवार (४९, रा. समडोळी, ता. मिरज, जि. सांगली), विशाल ऊर्फ मुक्या भीमराव पवार (२३, रा. बहादूरवाडी,ता. वाळवा, जि. सांगली) अशी त्यांची नावे आहेत. अन्य साथीदार योगेश काळे, मन्या पवार, तळपापड्या काळ्या हे फरार आहेत.

 

Web Title:  Four gangs of gangsters were arrested