शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
3
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
4
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
5
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
6
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
7
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
8
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
9
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
10
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
11
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
12
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
13
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
15
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
16
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
17
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
18
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
19
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
20
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

विभक्त होण्याच्या मार्गावर असलेली 4 जोडपी पुन्हा रमली संसारात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2017 7:56 PM

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारींचे निवारण व्हावे यासाठी 'महिला आयोग आपल्या दारी' अंतर्गत कोल्हापूर येथे जनसुनावणी घेण्यात आली.

कोल्हापूर, दि. 20 - महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारींचे निवारण व्हावे यासाठी 'महिला आयोग आपल्या दारी' अंतर्गत कोल्हापूर येथे जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी आयोगाकडे दाखल असलेल्या ३५ तसेच २५ नव्या तक्रारी अशा एकूण ६० तक्रारीवर सुनावणी घेण्यात आली. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, वकील, पोलीस अधिकारी, समुपदेशक, महिला बाल विकास अधिकारी यांच्या उपस्थितीत सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या ४ जिल्ह्यातील दाखल तक्रारींची सुनावणी, समुपदेशन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विभक्त होण्याचा निर्णय घेतलेल्या जोडप्यांचे समुपदेशन यावेळी करण्यात आले. यातील ४ जोडपी पुन्हा एकमताने संसारात रमली आहेत.

महिला आयोग आपल्या दारी मंगळवारी पुण्यात'महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत प्रयन्त करत आहे. महिलांना न्याय मिळावा यासाठी 'महिला आयोग आपल्या दारी' हा उपक्रम राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. यामध्ये विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. कोल्हापूर येथे आयोजित सुनावणीत ४ जिल्ह्यातील ६० तक्रारीवर कार्यवाही झाल्यानंतर आता २२ ऑगस्ट रोजी या संकल्पनेअंतर्गत आयोगाकडे दाखल असलेल्या पुणे जिल्ह्यातील तक्रारींची सुनावणी आयोजित करण्यात आली आहे. याच बरोबर नव्याने आलेल्या तक्रारींवर ही कार्यवाही करण्यात येणार आहे. सुनावणी, तक्रारीसाठी मुंबई कार्यालयात येणं शक्य नसलेल्या महिलांना याचा फायदा होणार आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या उपस्थितीत अल्पबचत भवन, राणीचा बाग रोड, कौन्सिल हॉल जवळ, पुणे येथे दुपारी 1 वाजता दाखल तक्रारीची सुनावणी आणि नव्या तक्रारी यावर कार्यवाही होणार आहे.