शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

ऑक्टोबरच्या वीस दिवसांतच चारवेळा ढगफुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 2:41 PM

rain, kolhapurnews, dhagfotti कोल्हापूर जिल्ह्यात ऑक्टोबरच्या पहिल्या वीस दिवसांत चारवेळा ढगफुटी झाली. करवीर तालुक्यात सर्वाधिक २४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसापेक्षा हा अधिक असून त्यामुळे खरिपाचे मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देकरवीर तालुक्यात सर्वाधिक २४० मिलीमीटर पाऊस गतवर्षीपेक्षा ५०० मिलीमीटर जादा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात ऑक्टोबरच्या पहिल्या वीस दिवसांत चारवेळा ढगफुटी झाली. करवीर तालुक्यात सर्वाधिक २४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गतवर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसापेक्षा हा अधिक असून त्यामुळे खरिपाचे मोठे नुकसान झाले आहे.यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यापासूनच मान्सून सक्रिय झाला. त्यामुळे खरिपाची उगवण जोमात झाली, त्यानंतर टप्प्या-टप्प्याने खरिपाला पोषक असाच पाऊस राहिला. सप्टेंबरनंतर पाऊस काहीशी विश्रांती घेईल, असा अंदाज होता. मात्र, ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. त्याला चक्रीवादळाची जोड मिळाल्याने पाऊस अद्याप थांबण्याचे नावच घेत नाही.

गेल्या वीस दिवसांत कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी १५९.५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस करवीर तालुक्यात २४० मिलीमीटर तर सर्वांत कमी ९१ मिलीमीटर भुदरगड तालुक्यात झाला आहे. या वीस दिवसांत चारवेळा ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे.

गतवर्षी १ ते २० ऑक्टोबरपर्यंत सरासरी १२६ मिलीमीटर पाऊस झाला होता. गेल्यावर्षी जुलै, ऑगस्टमध्ये धुवांधार पाऊस झाला होता. त्यामुळे वार्षिक सरासरीत जादा पाऊस झाला होता. मात्र, यंदा ऑक्टोबरमध्ये गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या वीस दिवसांत राधानगरी, चंदगड, शाहूवाडी, पन्हाळा, करवीर तालुक्यात चारवेळा ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे.धरणक्षेत्रातही जोरदार पाऊसगेल्या वीस दिवसांत धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत आहे. शाहूवाडी तालुक्यातील कासारी धरण क्षेत्रात ३७७ मिलीमीटर पाऊस झाला तर राधानगरीत १४२, वारणा ८९ तर दूधगंगा धरण क्षेत्रात ८८ मिलीमीटर पाऊस झाला.चंदगड, राधानगरी सरासरी मागेचऑक्टोबरमध्ये एवढा पाऊस होऊनही चंदगड व राधानगरी तालुक्याने अद्याप सरासरी ओलांडलेली नाही. चंदगडमध्ये सरासरीच्या ९२ टक्के तर राधानगरीच्या ६३ टक्के पाऊस झाला आहे.१ ते २० ऑक्टोबर या कालावधीत तालुकानिहाय झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये असा-तालुका     पाऊस

  • हातकणंगले   १६१
  • शिरोळ   १८८
  • पन्हाळा २४७
  • शाहूवाडी १४०
  • राधानगरी ८२
  • गगनबावडा २०१
  • करवीर २४०
  • कागल १४५
  • गडहिंग्लज २०४
  • भुदरगड ९१
  • आजरा ११५
  • चंदगड ९९

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर