शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: गर्भपाताच्या साडेचार लाखांच्या गोळ्या जप्त, सांगली येथे करवीर पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 12:57 IST

वितरक सुनील मळगे याला अटक

कोल्हापूर : गर्भपाताच्या गोळ्यांचा अवैध साठा करून विक्रेत्यांना त्याचा पुरवठा करणारा वितरक सुनील मल्लिनाथ मळगे (व ४९, रा. सांगलीवाडी, सांगली) याला करवीर पोलिसांनी अटक केली. गुरुवारी (दि.२३) त्याच्या सांगलीवाडी येथील घराची झडती घेतली असता, सुमारे साडेचार लाख रुपये किमतीचे ९४६ गोळ्यांचे किट पोलिसांनी जप्त केले. अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा तपास करताना प्रथमच पोलिसांना एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा सापडला.करवीर तालुक्यात ठिकठिकाणी अवैध गर्भलिंग निदान करून गर्भपात करणाऱ्या टोळीचा तपास करताना करवीर पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली आहे. गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री करणारा संशयित हाती लागताच गोळ्यांच्या वितरकापर्यंत पोलिस पोहोचले आहेत. सांगलीवाडी येथील सुनील मळगे याच्याकडून गर्भपाताच्या गोळ्यांचा पुरवठा होत असल्याचे समोर येताच पोलिसांनी त्याला अटक केली. गुरुवारी त्याच्या घराची झडती घेतली असता, ९४६ गोळ्यांचे किट पोलिसांना सापडले. सुमारे साडेचार लाखांच्या गोळ्यांचा साठा जप्त करून पोलिसांनी पंचनामा केला. त्याची अधिक चौकशी सुरू असून, त्याने कोणाकडून गोळ्या आणल्या? कोणाला पुरवठा केला?कधीपासून त्याचा हा व्यवसाय सुरू आहे? याचा तपास केला जाईल, अशी माहिती तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक युनुस इनामदार यांनी दिली.सहा आरोपी अटकेतया गुन्ह्यात पोलिसांनी गेल्या आठवडाभरात बोगस डॉक्टरसह तीन एजंट आणि गोळ्यांची विक्री करणाऱ्या एका विक्रेत्यास अटक केली होती. सुनील मळगे हा या रॅकेटमधील सहावा अटक आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSangliसांगलीAbortionगर्भपातCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस