गडरक्षण हीच खरी शिवसेवा - शाहू छत्रपती; किल्ले भुदरगडवर ‘आपला मावळा’ तर्फे स्वच्छता मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 13:28 IST2025-10-27T13:27:23+5:302025-10-27T13:28:10+5:30

खासदार नीलेश लंके यांचा साधेपणाचा धडा

Fort protection is the true service to Shiv says Shahu Chhatrapati; Aapla Mavla conducts cleanliness drive at Bhudargad Fort kolhapur | गडरक्षण हीच खरी शिवसेवा - शाहू छत्रपती; किल्ले भुदरगडवर ‘आपला मावळा’ तर्फे स्वच्छता मोहीम

गडरक्षण हीच खरी शिवसेवा - शाहू छत्रपती; किल्ले भुदरगडवर ‘आपला मावळा’ तर्फे स्वच्छता मोहीम

गारगोटी : छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केवळ तोंडी नको,तर त्यांच्या गडांचे रक्षण आणि संवर्धन ही आपली जबाबदारी आहे,” असा प्रभावी संदेश खासदार खासदार शाहू छत्रपती यांनी दिला.

खासदार नीलेश लंके यांच्या ‘आपला मावळा’ संघटनेतर्फे राबविण्यात येणाऱ्या गडसंवर्धन व स्वच्छता मोहिमेचा आठवा टप्पा किल्ले भुदरगड येथे रविवारी हजारो मावळ्यांच्या सहभागात उत्साहात पार पडला. या मोहिमेचा शुभारंभ खासदार शाहू छत्रपती, आमदार जयंत पाटील व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व्ही. बी. पाटील यांच्या हस्ते झाला.

शाहू महाराज म्हणाले,“गडांवरील स्वच्छता, मंदिर दुरुस्ती, सूचना फलक बसविणे हे छोटे उपक्रम असले तरी अत्यंत प्रभावी आहेत. नीलेश लंके यांनी पुढील पिढ्यांसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि सशक्त गड सोडून देण्याचे कार्य हाती घेतले आहे.त्यांचे प्रयत्न शिवरायांचे विचार जनमानसात रुजविणारे आहेत. ‘आपला मावळा’ ही संघटना भविष्यात लाखो तरुणांना एकत्र करून शिवकार्याच्या रणांगणात उतरलेली दिसेल, असा मला विश्वास आहे.

“शिवनेरीपासून सुरू झालेली ही मोहीम धर्मवीर, रायरेश्वर, रामशेज, तिकोना, प्रतापगड पार करून आता भुदरगडवर पोहोचली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांचा वारसा जतन करण्यासाठी हा उपक्रम आहे,” असे लंके यांनी सांगितले. गडसंवर्धनासाठी शासनाकडून विशेष निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

रविवारी सकाळी ‘आपला मावळा’चे टी-शर्ट परिधान केलेले हजारो युवक-युवती“जय शिवराय!”च्या घोषात फावडे, कुदळ, झाडू हातात घेऊन गडाकडे रवाना झाले.
यावेळी आर. के. पवार, राहुल देसाई, सत्यजित जाधव, प्रतीक पाटील, सुदेश सापळे, संतोष मेंगाने, अनिल घाटगे, सुनील शिंत्रे, प्रकाश पाटील, रणधीर मोरे, निखिल निंबाळकर, के. के. भारतीय उपस्थित होते.

लंके यांचा साधेपणाचा धडा

खासदार लंके यांच्या कार्यशैलीने प्रेरित होऊन हजारो मावळे या उपक्रमात सहभागी झाले. मात्र, त्यांनी कोणताही दिखावा न करता पुष्पनगर येथील शाळेत मुक्काम केला. पहाटे मावळ्यांसह जयघोषात गडाकडे प्रस्थान करणारा त्यांचा साधेपणा परिसरात चर्चेचा विषय ठरला.

Web Title : गढ़ों की रक्षा ही सच्ची शिवसेवा: शाहू छत्रपति; भुदरगढ़ में स्वच्छता अभियान।

Web Summary : शाहू छत्रपति ने गढ़ों की रक्षा को सच्ची शिवसेवा बताया। नीलेश लंके के 'आपला मावळा' ने भुदरगढ़ किले पर हजारों लोगों के साथ सफाई अभियान चलाया। लंके का लक्ष्य शिवाजी महाराज की विरासत को संरक्षित करना है, जिसके लिए धन सुरक्षित किया जा रहा है।

Web Title : Protecting forts is true Shivseva: Shahu Chhatrapati; cleanliness drive at Bhudargad.

Web Summary : Shahu Chhatrapati emphasizes fort protection as true Shivseva. 'Aapla Mavla' organized a cleanliness drive at Bhudargad fort with thousands participating. Nilesh Lanke aims to preserve Shivaji Maharaj's legacy, securing funds for fort conservation.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.