शिरोली : पाण्याच्या व्हाॅलची गळती काढताना अंगावर मातीचा ढिगारा पडल्याने हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती आणि टोप गावचे माजी सरपंचाचामृत्यू झाला. बाबासाहेब बापूसो पाटील (वय-६६) असे त्यांचे नाव आहे. ही घटना काल, बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली.याबाबत माहिती अशी की, बाबासाहेब पाटील यांचे टोप बिरदेव मंदिराच्या पाठिमागे वाळू धुण्याचा व्यवसाय आहे. याठिकाणी पाण्याच्या व्हाॅलला गळती होती. सदरची गळती काढण्यासाठी पाटील हे गेले होते. गळती काढत असताना त्यांच्या अंगावर मातीचा ढिगारा कोसळून गुदमरून मृत्यू झाला.त्यांना गावात आमदार या टोपन नावाने ओळखले जात होते. ते राष्ट्रीय काँग्रेसचे सक्रीय नेते होते. पंचायत समिती सभापती आणि टोप गावचे सरपंच असताना गावात अनेक सामाजिक कामे केली आहेत. त्यांच्या निधना नंतर गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली.
टोपच्या माजी सरपंचाचा मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 11:30 IST