कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील हे आज, शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश होणार आहे. पाटील यांच्या प्रवेशाने ‘गोकुळ’ सह करवीर विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.विश्वास पाटील हे गेली अनेक वर्षे कॉंग्रेस सोबत राहिले आहेत. दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख जिल्ह्यात होती. पण, ‘गोकुळ’च्या मागील निवडणुकीत त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटातील प्रवेशावेळी त्यांनी कॉंग्रेस सोबत राहणेच पसंत केले.पण, त्यांचे सुपुत्र सचिन पाटील हे पाडळी खुर्द जिल्हा परिषद मतदारसंघातून इच्छुक आहेत. मतदारसंघाची राजकीय गणिते पाहता, शिंदेसेनेचा पर्याय असल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या निर्णयाने ‘गोकुळ’ व करवीर मतदारसंघातील राजकीय गणिते बदलणार हे मात्र निश्चित आहे.त्यांच्या सोबत शिरोली दुमालाचे लोकनियुक्त सरपंच सचिन पाटील यांच्यासह तालुक्यातील शेकडो पदाधिकारी शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत. आज, सायंकाळी साडे चार वाजता कोल्हापुरातील शाहू मार्केट यार्ड परिसरातील एका हॉटेलमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आमदार चंद्रदीप नरके यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे.
Web Summary : Vishwas Patil, ex-Gokul head, joins Shinde's party in Kolhapur, altering political dynamics in Gokul and Karveer. His son's political aspirations influenced the decision, impacting local elections. Hundreds of supporters will also join.
Web Summary : कोल्हापुर में गोकुल के पूर्व प्रमुख विश्वास पाटिल शिंदे की पार्टी में शामिल, गोकुल और करवीर में राजनीतिक समीकरण बदले। उनके बेटे की राजनीतिक आकांक्षाओं ने फैसले को प्रभावित किया, जिससे स्थानीय चुनावों पर असर पड़ेगा। सैकड़ों समर्थक भी शामिल होंगे।