सरवडे : मागील ४० वर्षांच्या राजकीय व सामाजिक कार्यकाळात आपण नेहमीच कार्यकर्त्यांना जपण्याचे काम केले आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीने आपल्याला काही निर्णय घ्यावे लागले. परंतू आता आपल्या कार्यकर्त्यांना स्वास्थ्य देण्यासाठी आणि त्यांचा माझ्यावरील विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी विनाअट अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती माजी आमदार के. पी. पाटील यांनी दिली. माजी आमदार के. पी. पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. याबाबत मुदाळ येथे घेतलेल्या पत्रकार बैठकीत आपली भूमिका स्पष्ट केली.त्यांनी आपला राष्ट्रवादीतील प्रवेश निश्चित झाला असून येत्या २३ मे रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आपण पक्षात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट करत चर्चेला पूर्णविराम दिला.पाटील म्हणाले, मी जरी प्राप्त राजकीय परिस्थितीत शिवसेनेकडून उमेदवारी घेतली असली तरी माझ्या कार्यकर्त्यांची मानसिकता राष्ट्रवादीतच राहण्याची असल्याने हा निर्णय घेतला आहे. यावेळी बिद्री साखर कारखान्याचे संचालक पंडितराव केणे, माजी सभापती विश्वनाथ कुंभार, प्रा. एच. आर. पाटील, मच्छिंद्र मुगडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. हसन-किसनची जोडगोळी मंत्री हसन मुश्रीफ आणि माझी मैत्री सर्वश्रृत आहे. कितीही राजकीय अडथळा आला तरी आम्ही आमची मैत्री तुटू दिलेली नाही. त्यांच्यासारखे सहकार्य आणि जवळीकता अन्य पक्षात मिळणे शक्य नाही. म्हणूनच त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतली असून आपली हसन-किसन ची जोडगोळी यानिमित्ताने पुन्हा एकत्र येत असल्याचा आपल्याला मनस्वी आनंद होत आहे.
Kolhapur: के. पी. पाटलांचं अखेर ठरलं..; हातात राष्ट्रवादीचं घड्याळ बांधणार, अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 18:58 IST