Kolhapur Politics: माजी आमदार डॉ. सुचित मिणचेकर शिंदेसेनेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 18:19 IST2025-02-28T18:14:44+5:302025-02-28T18:19:46+5:30

मुंबई : उद्धवसेनेचे हातकणंगले मतदारसंघाचे माजी आ. डॉ. सुजित मिणचेकर आणि मनसे जिल्हाप्रमुख गजानन जाधव यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ ...

Former MLA from Kolhapur Dr Suchit Minchekar in Shindesena | Kolhapur Politics: माजी आमदार डॉ. सुचित मिणचेकर शिंदेसेनेत

Kolhapur Politics: माजी आमदार डॉ. सुचित मिणचेकर शिंदेसेनेत

मुंबई : उद्धवसेनेचे हातकणंगले मतदारसंघाचे माजी आ. डॉ. सुजित मिणचेकर आणि मनसे जिल्हाप्रमुख गजानन जाधव यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला.

शिंदे यांच्या मुक्तागिरी निवासस्थानी झालेल्या पक्ष प्रवेशावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्यासह हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. शिंदे यांनी डॉ. मिणचेकर आणि गजानन जाधव यांच्या पक्षप्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पक्ष अधिक भक्कम होईल, असे सांगितले.

कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेत खासदार धैर्यशील माने प्रचंड मतांनी विजयी झाले होते. तर, विधानसभेतही येथे महायुतीचे १० पैकी १० आमदार विजयी झाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही असाच विजय मिळावा यासाठी डॉ. मिणचेकर, जाधव यांचे सहकार्य मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

Web Title: Former MLA from Kolhapur Dr Suchit Minchekar in Shindesena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.