शहरं
Join us  
Trending Stories
1
सिक्कीममध्ये निसर्गाचं रौद्र रूप; भूस्खलनामुळे ९ जणांचा मृत्यू, १२०० पर्यटक अडकले
2
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती बिघडली, मेदांता रुग्णालयात दाखल
3
छत्तीसगडमध्ये पोलीस आणि सीआरपीफच्या पथकाला मोठं यश, चकमकीत मारले गेले ८ नक्षलवादी
4
SBI चा ग्राहकांना तगडा झटका, मासिक EMI वाढणार! MCLR च्या दरात 10 बेसिस प्वाइंट्सची वाढ 
5
वहीतुला करताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव पारड्यातून पडले; व्हिडीओ व्हायरल
6
नरेंद्र मोदींसोबत जॉर्जिया मेलोनींचा खास सेल्फी; दोन्ही नेत्यांमध्ये 'या' मुद्द्यांवर चर्चा
7
Ganga Dussehra 2024: दहा प्रकारच्या पापातून मुक्ती मिळवण्याचे दहा प्रकार गंगा दशहराच्या मुहूर्तावर करा!
8
संगमेश्वर बाजारपेठेत मोठी आग, लाखो रुपयांचे नुकसान
9
दिल्लीत पाण्यावरून राजकारण तापलं; AAP च्या विरोधात काँग्रेस मडकी फोडून करणार आंदोलन
10
Tarot Card: कामांचा क्रम ठरवून सुरुवात केली तर निश्चितच यश मिळेल; वाचा येत्या आठवड्याचे भविष्य!
11
पाकिस्तानचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपले! अक्रमकडून पाकिस्तानी खेळाडूंचा 'करेक्ट कार्यक्रम'
12
चिंताजनक! भारतीय तरुणांमध्ये झपाट्याने वाढतंय कॅन्सरचं प्रमाण; 'असा' करा बचाव
13
ईडीची मोठी कारवाई, बसपाचे माजी आमदार मोहम्मद इक्बाल यांची ४४४० कोटींची मालमत्ता जप्त
14
"कुर्बानी के जानवर हाजीर हो", पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर; माजी खेळाडूची बोचरी टीका
15
मराठी अभिनेत्रीसाठी सचिन तेंडुलकरच्या लेकाची पोस्ट, फोटो शेअर करत अर्जुन म्हणतो...
16
सर्वसामान्यांना मोठा दिलासा, आजपासून 'या' ५४ अत्यावश्यक औषधांच्या किमती घटणार
17
ऐश्वर्या नाही तर सलमान खान या अभिनेत्रीसोबत थाटणार होता संसार, कोण आहे ती?
18
अफगाणिस्तान सुपर-८ मध्ये पोहोचला; पण स्टार स्पिनर T20 World Cup मधून बाहेर झाला
19
ठाकरे गटाला मोठा धक्का; माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
20
फुटबॉलचा Mini World Cup! यजमान जर्मनीची विजयी सलामी; स्कॉटलंडचा दारूण पराभव 

ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीची जागा माजी पालकमंत्र्यांनी हडपली, राजेश क्षीरसागरांचा आरोप

By भारत चव्हाण | Published: November 16, 2023 7:39 PM

२ जानेवारीपासून आमरण उपोषण करण्याचा ख्रिश्चन समाजाने दिला इशारा

कोल्हापूर : ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीची जागा माजी पालकमंत्र्यांनी हाडपली असल्याचा आरोप राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी गुरुवारी येथे केला. ख्रिश्चन समाजाच्या एका शिष्टमंडळाने गुरुवारी क्षीरसागर यांना भेटून दफनभूमीच्या जागेबाबत चर्चा केली. त्यानंतर क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीत याबाबत चर्चा केली. अन् त्यांनी हा आरोप केला.ख्रिश्चन समाजाला दफनभूमी साठी जागा उपलब्ध करताना प्रशासनास तारेवरची कसरत करावी लागत होती. सन २०१४ पासून कदमवाडी येथील जागा दफनभूमीला देण्याची प्रक्रिया सुरु होती. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ही जागा दफनभूमीसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. असे असताना सद्यस्थितीत ही जागा डी. वाय. पाटील महाविद्यालय या संस्थेला देण्यात आली असल्याचे दिसत आहे. पालकमंत्री म्हणून काम करताना जनतेचे पालकत्व स्वीकारून जनतेच्या जिव्हाळ्याची कामे बाजूला ठेवून जनतेच्या जागा हडपण्याचे पाप माजी पालकमंत्र्यांनी केले असून याचे उत्तर जनताच त्यांना देईल, अशी टीका क्षीरसागर यांनी केली.

एकीकडे ख्रिश्चन समाजाला दफनविधी करण्याकरीता जागा उपलब्ध होत नसताना नियोजित केलेली जागा परस्पर खाजगी संस्थेला देण्यात आली? या मागील गौडबंगाल काय आहे? जागेच्या मोबदल्यात आवश्यक शासकीय शुल्क संबधित संस्थेने भरले आहे का? कोणत्या आधारावर सदर जागा दिली गेली? अशी विचारणा क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना केली. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून कामात हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

पर्यायी जागा देण्याचा विचार करुयाबाबत प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी दफनभूमीसाठी पर्यायी जागा देता येईल का? याचा विचार केला जाईल, असे सांगितले.

२ जानेवारीपासून आमरण उपोषणख्रिश्चन समाजाच्या शिष्टमंडळाने आपल्या वेदना राजेश क्षीरसागर तसेच प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या समोर मांडली. जर यातून मार्ग निघाला नाही तर महापालिकेच्या दारात २ जानेवारीपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा ख्रिश्चन समाजाच्या शिष्टमंडळाने प्रशासनाला दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील