शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

पोलिस अधिकाऱ्यावरच माजी नगरसेविकेच्या मुलाने रोखली एअरगन, कोल्हापुरातील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 14:01 IST

राजारामपुरी पोलिसांकडून घटना लपविण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : वाद मिटविण्यासाठी गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यावरच एका माजी नगरसेविकेच्या मुलाने एअरगन रोखत धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी प्रतिभानगर परिसरात घडला. या प्रकरणी साहिल पाटील या संशयितास राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

प्रतिभानगर परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे पूर्ववैमनस्य आणि आर्थिक वादातून विक्रेत्यांनी संबंधित माजी नगरसेविकेच्या मुलास मारहाण केल्याचे समजते. या प्रकाराची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांचे एक पथक घटनास्थळावर पोहोचल्यानंतर त्यांच्याबाबतीत हा धक्कादायक प्रकार घडला. यामुळे या परिसरात रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते.शास्त्रीनगर परिसरात राहणाऱ्या एका माजी नगरसेविकेचा मुलाने रविवारी सायंकाळी एका सँडविच विक्रेत्याकडे पैशाची मागणी केली. यावेळी विक्रेत्यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. यातून विक्रेत्यांसोबत त्याची वादावादी झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या या नगरसेविकेच्या मुलाने घरी जाऊन ही घटना आईवडिलांना सांगितली. दरम्यान, या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी राजारामपुरी पोलिसांना दिली. याच वेळी तलवार आणि एअरगन घेऊन आलेल्या त्या नगरसेविकेच्या मुलाने दुचाकीवरून पुन्हा एंट्री घेतली.त्याने विक्रेत्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. याच वेळी राजारामपुरी पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या मुलास अडविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने स्वत:जवळील एअरगन एका पोलिस अधिकाऱ्यावरच रोखली. या प्रकरणी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेऊन राजारामपुरी पोलिस ठाण्यात नेले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, या प्रकारामुळे घटनास्थळावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिसरातील नागरिक या प्रकारामुळे भयभीत झाले.खाद्यपदार्थ विक्रेत्यांना मारहाणमाजी नगरसेविकेच्या या मुलाने सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास प्रतिभानगर परिसरातील एका सँडविचवाल्याकडे पैसे मागितल्याचा आरोप विक्रेत्यांनी केला आहे. आर्थिक देवाणघेवाण आणि पूर्ववैमनस्यातून विक्रेत्याचा आणि संबंधिताचा वाद झाला. यातून एकमेकांना धक्काबुक्की झाल्याचा प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नगरसेविकेच्या मुलाने घरातून तलवार आणि एअरगन आणल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात आले. दरम्यान, वादावादीमध्ये मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांनाही धक्काबुक्की करत त्यांच्यावरच एअरगन रोखल्याचेही काही व्यावसायिकांनी सांगितले.

राजारामपुरी पोलिसांकडून घटना लपविण्याचा प्रयत्न

दरम्यान, पोलिस अधिकाऱ्यावरच एअरगन रोखल्याचा धक्कादायक प्रकार घडूनही राजारामपुरी पोलिसांनी ही घटना लपविण्याचा प्रयत्न केला. केवळ एका माजी नगरसेविकेच्या मुलामध्ये आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे सांगत यावर पडदा टाकला जात होता. दरम्यान, १५ दिवसांपूर्वी खासगी सावकारकी करणाऱ्या व्यक्तींबाबत राजारामपुरी पोलिसांनी घेतलेली भूमिका संशयाच्या भोवऱ्यात असतानाच हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी तीन खासगी सावकारांना अटक करूनही त्याबाबतची माहिती लपविण्याचे काम सुरू आहे. यामागचे गौडबंगाल अद्यापही गुलदस्तात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस