शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

Kolhapur: इचलकरंजी भाजपात बंडखोरी, हिंदुराव शेळके विधानसभेच्या रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 16:01 IST

आवाडे विरोधकांची मोट बांधणार

इचलकरंजी : भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष हिंदुराव शेळके यांनी विधानसभा निवडणुकीत उभारणार असल्याची घोषणा पत्रकार परिषद घेऊन केली. त्यामुळे इचलकरंजीभाजपात बंडखोरी झाली असून, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा केलेला प्रयत्न अपयशी ठरताना दिसत आहे.शेळके म्हणाले, २००४ साली मला भाजपने विधानसभेची उमेदवारी दिली होती. त्यावेळी प्रकाश आवाडे यांनी सत्तेच्या बळावर उमेदवारी अर्ज छाननीमध्ये उडविला. त्यापूर्वी जवळपास ४० वर्षांपासून आम्ही आवाडे विरोधक आहोत. असे असताना पक्षाने निष्ठावंतांना डावलून ज्यांच्याशी संघर्ष केला, त्या आवाडे घराण्यात उमेदवारी देण्याचे ठरवले. ही भूमिका कार्यकर्त्यांना रूचली नाही.इचलकरंजीसह जिल्ह्यात पक्ष मजबूत करण्याचे काम करणारे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर हे सक्षम उमेदवार असताना तसेच पक्षातील माझ्यासह अन्य इच्छुक उमेदवार असताना पक्षाने सर्वांना डावलले. त्याचबरोबर आवाडे यांच्या घराणेशाहीला जनता कंटाळली असून सक्षम पर्याय शोधत आहे. त्यासाठी आपण मतदारांच्या पाठबळावर आखाड्यात उतरत आहोत.आवाडे विरोधकांची मोट बांधणारमी यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी करून भाजपामध्ये आलो आहे. त्यामुळे सगळ्या पक्षांमध्ये माझे मित्र आहेत. तसेच इचलकरंजीतील ३२ विभागांतील भाजपचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. या सर्वांची आवाडेविरोधी एकत्रित मोट करणार आहे.सर्व पर्याय खुलेभाजपाने निष्ठावंतांना डावलल्याने कार्यकर्त्यांचा सन्मान जपण्यासाठी आणि शहराच्या विकासासाठी आपण निवडणुकीस सामोरे जात असून काँग्रेस, राष्ट्रवादीसह कोणत्याही पक्षाकडून उमेदवारीसाठी विचारणा झाल्यास आपण सर्व पर्याय खुले ठेवले आहेत.मी पदाला न्याय दिलाजिल्हाध्यक्ष असताना चंदगडपासून शिरोळपर्यंत, तसेच कागलपासून हातकणंगलेपर्यंत गावोगावी जाऊन शाखा स्थापन केली. जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये सदस्य निवडून आणले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीvidhan sabhaविधानसभाBJPभाजपा