शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

बेनिक्रेच्या पाणी योजनेला वनखात्याचे कुंपण

By admin | Updated: September 3, 2015 23:52 IST

पाण्याचे दुर्भिक्ष्य : लघु पाटबंधाऱ्यात अपुरा पाणीसाठा, ४00 फूट लांबीच्या पाईप खुदाईला परवानगी नाही

म्हाकवे : बेनिक्रे (ता. कागल) येथील पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी ज्योतिर्लिंग पाणी वापर संस्थेच्या प्रयत्नातून वेदगंगा नदीवरून सुरुपली येथून स्वतंत्र पाणी योजना पूर्णत्वाकडे गेली आहे. मात्र, केवळ वनखात्याच्या हद्दीतील ४०० फूट लांबीच्या पाईप खुदाईला या खात्याने अद्याप परवानगीच न दिल्याने ही योजना अडखळली आहे. वनखात्याने येथील ग्रामस्थांच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेऊन त्वरित परवानगी दिल्यास केवळ महिनाभरात ही योजना कार्यान्वित होऊ शकते, अशी स्थिती आहे.२०१३ मध्ये गावातील शेतकऱ्यांनी सामूहिकपणे कर्ज घेऊन सर्वच शेती ओलिताखाली आणण्यासाठी शासनाशी निखराची झुंज देऊन सुरुपली येथून वेदगंगेतून पाणी उपसा करण्याची परवानगी मिळविली. सुमारे अडीच कि.मी. अंतराच्या आणि सव्वातीन कोटी रुपये खर्चाच्या या पाणी योजनेचे काम अतिशय जलदगतीने करण्यात आले. नदीतून पाणी पाईपद्वारे येथील लघु पाटबंधारे प्रकल्पात टाकायचे आणि तेथून शेतीसह पिण्यासाठी वापरायचे असे नियोजन आहे. विशेष बाब म्हणजे पाणी योजनेसाठी लागणारा सर्व निधी शेतकऱ्यांनी कर्ज स्वरूपात उभा केला आहे.दरम्यान, येथील ज्योतिर्लिंग पाणीपुरवठा संस्थाही अतिशय काटेकोरपणे पाण्याचा वापर करीत आहे, परंतु यंदा अपुऱ्या पावसामुळे या प्रकल्पात पाणीसाठाच झालेला नाही. वेदगंगेतून आलेली पाणी योजना पूर्ण होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब वाडकर, उपाध्यक्ष गणपती इंगळे, बाळासाहेब शिंदे, रवी पाटील, वसंत जाधव, सचिव रवींद्र वाडकर, आदी शासनदरबारी हेलपाटे घालून पाठपुरावा करीत आहेत.परवानगीसाठी नागपूरकडे धावरहिवासी इथले, गायरान, शेतकरी, शेती, पाणी इथले; मात्र वनखात्याच्या हद्दीतून पाणी योजना नेण्यासाठी नागपुरातील अधिकारी परवानगी देणार, ही आश्चर्यकारक बाब आहे. तरीही शासकीय रितसर परवानगीचा सोपस्कार पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी नागपूर येथील कार्यालयात कागदपत्रे पोहोचवून पाण्याच्या दुर्भिक्ष्यापासून बचावासाठी प्रयत्न सुरूच ठेवले आहेत.शेतकऱ्यांच्या योगदानातून कोणत्याही शासकीय निधीशिवाय वेदगंगेतून पाणी योजना करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. वनखात्याच्या हद्दीतील केवळ ४०० फूट खुदाई करण्यासाठी नागपूर येथील कार्यालयात आम्ही फेऱ्या मारत आहोत. ही योजना त्वरित पूर्ण होऊन शेतीच्या उत्पादनात वाढ होणे गरजेचे आहे, अन्यथा शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होणार आहे. - रवींद्र वाडकर, सचिव, ज्योतिर्लिंग पाणीपुरवठा संस्था