शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

सात-बारा कोरा करण्यास भाग पाडू : समरजित घाटगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 2:27 PM

विधानसभेच्या अधिवेशनात शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्यासाठी सरकारला भाग पाडू, असा इशारा भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी दिला.

ठळक मुद्देसात-बारा कोरा करण्यास भाग पाडू : समरजित घाटगे राज्यपालांना ५0 हजारांहून अधिक पत्रे

कोल्हापूर : विधानसभेच्या अधिवेशनात शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्यासाठी सरकारला भाग पाडू, असा इशारा भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी दिला.घाटगे यांनी गुरुवारी ‘लोकमत’ला सदिच्छा भेट दिली. संपादक वसंत भोसले आणि वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले. घाटगे म्हणाले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्र्रकांत पाटील यांनी जाणीवपूर्वक जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपविली आहे. त्यांच्या विश्वासाला पात्र राहण्याचा माझा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे. त्यामुळेच यापुढच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यात भाजप सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणार आहे.

भाजपतर्फे आम्ही शेतकऱ्यांना राज्यपालांना पत्रे लिहण्याबाबत आवाहन के ले होते. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. राज्यपालांना आम्ही ५0 हजार शेतकऱ्यांची पत्रे पाठविणार आहोत.

या सगळ्याच्या जोरावर येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी आम्ही सात-बारा कोरा करण्यासाठी सरकारला भाग पाडू. साखर उद्योगामध्ये नवीन काही तरी करण्याची गरज आहे. त्यानुसार काही राज्यांचा मी दौरा करून आलो. त्याचे फायदे पाहता सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे घाटगे यांनी सांगितले.

नव्या, जुन्यांचा समन्वयभाजपच्या तालुकाध्यक्षांच्या निवडी झाल्या, मात्र, कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी थांबलो आहे. जुन्या, नव्या कार्यकर्त्यांशी चर्चा करा आणि मगच पक्षाचे प्रामाणिकपणे काम करणाºयांचा कार्यकारिणीमध्ये समावेश करा, अशा सूचना दिल्याचे घाटगे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Samarjit Singh Ghatgeसमरजितसिंह घाटगेkolhapurकोल्हापूरLokmatलोकमत