शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

चार वर्षे फुकट बिर्याणी खाल्ली, कोल्हापूर पोलिसांनी गुंडाची मस्ती उतरवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 13:31 IST

कोल्हापूर : ‘पैसे काय मागतोस, मी कोण आहे तुला माहिती नाही काय?’ असे धमकावत चार वर्ष फुकट बिर्याणी खाणाऱ्या ...

कोल्हापूर : ‘पैसे काय मागतोस, मी कोण आहे तुला माहिती नाही काय?’ असे धमकावत चार वर्ष फुकट बिर्याणी खाणाऱ्या गुंडाला शाहूपुरी पोलिसांनी शनिवारी (दि. ६) रात्री ताराराणी चौक परिसरातून अटक केली. आकाश आनंद भोसले (वय ३०, रा. माकडवाला वसाहत, ताराराणी चौक, कोल्हापूर) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे. फेरीवाले आणि व्यावसायिकांना त्रास देणाऱ्या गुंडांचा बंदोबस्त करण्याची मोहीम या कारवाईने सुरू झाली.माकडवाला वसाहतीत राहणारा आकाश भोसले हा गेल्या चार वर्षांपासून मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना दमदाटी करून त्यांच्याकडून फुकट खाद्यपदार्थ उकळत होता. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास व्यवसाय करू देणार नाही, असेही तो धमकावत होता. शाहूपुरी पोलिसांनी शनिवारी फेरीवाले आणि व्यावसायिकांची बैठक घेऊन गुंडांच्या विरोधात तक्रारी देण्याचे आवाहन केले.त्यानुसार काही व्यावसायिकांनी आकाश भोसले या गुंडाबद्दल तक्रार दिली. पोलिसांनी शनिवारी रात्री या गुंडाला माकडवाला वसाहतीमधून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने बिर्याणी सेंटरवरून अनेकदा फुकट बिर्याणी आणि मासे घेतल्याची कबुली दिली. पोलिसांनी अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांच्या सूचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ, सहायक फौजदार संदीप जाधव, मिलिंद बांगर, बाबा ढाकणे, लखन पाटील, महेश पाटील, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.अन्य गुंडांचा शोध सुरूआकाशचे सातवीपर्यंत शिक्षण झाले असून, शहरात टोपी, गॉगल विक्रीचा ढकल गाडा चालवत असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. या गुन्ह्यात त्याच्या काही साथीदारांचाही समावेश असू शकतो. त्या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.व्यावसायिकांमध्ये गुंडांची दहशतपोलिसांनी बैठक घेऊन फेरीवाले आणि व्यावसायिकांना गुंडांच्या विरोधात तक्रारी देण्याचे आवाहन केले आहे. तक्रारदारांचे नाव गोपनीय ठेवण्याचे आश्वासन देऊनही व्यावसायिक तक्रारी देण्यास निरूत्साही होते. पहिल्या दिवशी केवळ एका गुंडाचे नाव त्यांच्याकडून मिळाले. यावरून व्यावसायिकांमध्ये गुंडांची दहशत असल्याचे स्पष्ट होते.तीन पोलिस ठाण्यांनी घेतल्या बैठकापोलिसांच्या मासिक गुन्हे आढावा बैठकीनंतर गुंडांवर कारवायांची धडक मोहीम सुरू करणार असल्याचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले. तत्पूर्वीच पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली असून, शहरातील शाहूपुरी, लक्ष्मीपुरी आणि राजारामपुरी पोलिसांनी त्यांच्या परिसरातील फेरीवाले, विक्रेत्यांच्या बैठका घेऊन गुंडांची माहिती काढणे सुरू केले. शाहूपुरी पोलिसांनी पहिली कारवाई केली असून, काही सराईत गुंड रडारवर असल्याचे निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी सांगितले.

या परिसरात गुंडांचा वावरमध्यवर्ती बसस्थानकासह राजारामपुरी, सायबर चौक, हॉकी स्टेडियम चौक, रंकाळा या परिसरात स्थानिक गुंडांची दहशत आहे. कनाननगर, सदर बाजार, ताराराणी चौक, राजेंद्रनगर, लक्षतीर्थ वसाहत येथील गुंड त्यांच्या साथीदारांकडून दहशत आणि खंडणीचे रॅकेट चालवतात. यात काही व्हाईट कॉलर गुंडांचाही समावेश आहे.

दहा वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूदकलम ३८४, ३८६, ५०४ आणि ५०६ नुसार गुंड भोसले याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. धमकावणे, बळजबरी करणे, जबरदस्तीने वस्तू काढून घेणे, जिवे मारण्याची धमकी देणे हे गुन्हे न्यायालयात सिद्ध झाल्यास त्याला दहा वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस