कोल्हापूर : महापालिकेचा निकाल जाहीर होताच शहरात ठिकठिकाणी विरोधक आमने-सामने आले. कनाननगर आणि शिवाजी पेठेत दोन गटांमध्ये दगडफेकीसह तुंबळ हाणामारी झाली. या घटनांमुळे घटनांमुळे तणाव वाढला आहे. पोलिसांनी बळाचा वापर करीत जमाव पांगवला असला तरी तणाव कायम आहे.प्रभाग क्रमांक चारमधील कनाननगर येथे दिलीप पवार आणि मयूर पवार यांचे गट आमने-सामने आल्याने धुमश्चक्री उडाली दोन्ही गट आपसात भिडल्याने हाणामारी झाली. यात महिलांचाही समावेश होता. दगडफेक होताच पोलिसांनी तातडीने धाव घेऊन जमाव पांगवला.
वाचा : नगरपालिकेची महापालिका झाली, 'या' ठिकाणी भाजपने एकहाती सत्ता मिळवली
प्रभाग क्रमांक आठमध्ये मानसिंग बोंद्रे यांच्या घराजवळ दगडफेक झाली. यात तीन घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. एका जिपची तोडफोड झाली. पोलिसांनी धाव घेऊन जमावाला पांगवले. बंदोबस्तात वाढ केली असून, पोलिसांनी संचलन करून शांततेचे आवाहन केले.
Web Summary : Post-election clashes erupted in Kolhapur, with stone pelting and fighting reported in Kanan Nagar and Shivaji Peth. Police intervened to disperse the crowds, but tension remains high after property damage.
Web Summary : कोल्हापुर में चुनाव के बाद झड़पें हुईं, कनन नगर और शिवाजी पेठ में पथराव और लड़ाई की सूचना मिली। पुलिस ने भीड़ को तितर-बितर करने के लिए हस्तक्षेप किया, लेकिन संपत्ति के नुकसान के बाद तनाव अधिक है।