भावजयीच्या मृत्यूच्या धक्का बसून पाठोपाठ नणंदेचाही मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 18:10 IST2021-02-12T18:01:25+5:302021-02-12T18:10:47+5:30
Death Kolhapur- भावजयीच्या मृत्यूच्या धक्का बसून पाठोपाठ धाकट्या नणंदेचाही मृत्यू झाल्याची घटना कोल्हापुरात घडली. या दुर्देवी घटनेमुळे नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

भावजयीच्या मृत्यूच्या धक्का बसून पाठोपाठ नणंदेचाही मृत्यू
कोल्हापूर : भावजयीच्या मृत्यूच्या धक्का बसून पाठोपाठ धाकट्या नणंदेचाही मृत्यू झाल्याची घटना कोल्हापुरात घडली. या दुर्देवी घटनेमुळे नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
कोल्हापुरात आझाद चौक येथे राहणाऱ्या अनुसया मधुकर आडनाईक (वय ७८) यांचे बुधवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच पन्हाळा तालुक्यातील कोडोली-अंबाबाई गल्ली येथून त्यांच्या नणंद विमल दत्तात्रय जाधव-भोप (वय ६६) तत्काळ कोल्हापुरात आल्या.
भावजयीचे अंतिम दर्शन घेतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना अचानक हृद्यविकाराचा धक्का बसला, आणि त्या बेशुद्ध पडल्या. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात हलविले, परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. काही तासांच्या अंतराने नणंद आणि भावजयीचा मृत्यू झाल्याने नातेवाईंकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.