शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
3
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
4
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
5
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
6
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
7
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
8
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
9
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
11
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
12
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
13
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
14
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
15
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
16
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
17
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
18
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
19
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
20
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला

सांडपाण्याचे प्रमाण कमी करण्यावर लक्ष :आयुक्त कलशेट्टी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 6:04 PM

पाण्याचा वापर जपून केला तर शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे प्रमाण कमी होईल आणि पर्यायाने पर्यावरणालाही हानी पोहोचणार नाही. म्हणून हॉटेल व्यावसायिकांनी त्यांच्या ग्राहकांना पाण्याचा वापर कमीत कमी करण्यास सांगावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शुक्रवारी रात्री शहरातील हॉटेलमालक व्यावसायिकांच्या बैठकीत केले.

ठळक मुद्देसांडपाण्याचे प्रमाण कमी करण्यावर लक्ष :आयुक्त कलशेट्टी हॉटेल व्यावसायिकांची बैठक

कोल्हापूर : पाण्याचा वापर जपून केला तर शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे प्रमाण कमी होईल आणि पर्यायाने पर्यावरणालाही हानी पोहोचणार नाही. म्हणून हॉटेल व्यावसायिकांनी त्यांच्या ग्राहकांना पाण्याचा वापर कमीत कमी करण्यास सांगावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शुक्रवारी रात्री शहरातील हॉटेलमालक व्यावसायिकांच्या बैठकीत केले.महानगरपालिका प्रशासनाने शहरात लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबविण्याचे ठरविले आहे. एकीकडे जनजागृती आणि दुसरीकडे लोकांच्या सहभागातून नाले, उद्याने, शहर स्वच्छ करण्याची मोहीम राबविली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी रात्री हॉटेल अ‍ॅट्रिया येथे आयुक्त कलशेट्टी यांनी कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेऊन मार्गदर्शन केले.हॉटेलमध्ये निर्माण होणाऱ्या दैनंदिन ओल्या व सुक्या कचऱ्यांचे व्यवस्थापन तसेच प्लास्टिकबंदी याबाबत घ्यायची खबरदाररी याविषयी माहिती आयुक्त कलशेट्टी यांनी बैठकीत सांगितली. हॉटेलमध्ये पाण्याचा वापर कमीत कमी प्रमाणात करण्यात यावा; यामुळे सांडपाणी कमी प्रमाणात तयार होईल व महानगरपालिकेस कराव्या लागणाऱ्या सांडपाणी निर्गतीकरणाची समस्या कमी होईल. या वर्षी सांडपाणी तयार होण्याचे प्रमाण ९५ द.ल. लिटरवरून ८५ द.ल. लिटर करण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे आयुक्तांनी सांगितले.पर्यावरणवादी कार्यकर्ते उदय गायकवाड यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व हॉटेलमालकांनी पंचगंगा नदी प्रदूषण रोखणेकामी आवश्यक माहिती संकलित करण्याकरिता सहकार्य करावे, असे आवाहन केले. अनिल चौगले यांनी घनकचरा व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले.यावेळी आरोग्यधिकारी दिलीप पाटील, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, हॉटेल मालक संघाचे उपाध्यक्ष सचिन शानभाग, सेक्रेटरी सिद्धार्थ लाटकर, जॉइंट सेक्रेटरी आशिष रायबागे, बाळ पाटणकर, शंतनू पै, शेखर काळे, श्रीकांत पुरेकर, राजू माळकर, नकुल पाटणकर, उमेश राऊत, अरुण भोसले (चोपदार), दिलीप पवार, अमरजा निंबाळकर यांच्यासह अनेक हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते. 

 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईkolhapurकोल्हापूर