शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेचा दारूचा पूर विधानसभेत ओसरला

By admin | Updated: October 17, 2014 00:52 IST

सरासरी विक्रीत केवळ ५० हजार लिटरची वाढ

एकनाथ पाटील - कोल्हापूर -सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत तब्बल २० लाख लिटर दारूची विक्री झाली होती. त्यानंतर आता विधानसभा निवडणूक काळात ही विक्री पाचपटींनी वाढेल, असा उत्पादन शुल्क विभागाचा अंदाज होता; परंतु तो फोल ठरला. महिन्याला नऊ लाख लिटर दारूच्या होणाऱ्या विक्रीमध्ये फक्त ५० हजार लिटरची वाढ झाली. यावरून लोकसभा निवडणुकीत आलेला दारूचा पूर बहुरंगी आणि चुरशीच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र ओसरला, असे दिसून आले. ग्रामपंचायतीपासून ते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारूची मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. जिल्ह्यात देशी-विदेशी दारूची महिन्याला नऊ लाख लिटर विक्री होते. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अवघ्या २० दिवसांत २० लाख लिटर दारू रिचवली गेली. त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुका आल्याने व त्या प्रस्थापित उमेदवारांच्या प्रतिष्ठेच्या असल्याने दारूची विक्री मोठ्या प्रमाणात होईल, असा अंदाज उत्पादन शुल्क विभागाला होता. त्यासाठी त्यांनी गोव्याहून येणाऱ्या चंदगड-आंबोली, कर्नाटक-कागल, राधानगरी-फोंडा आणि गगनबावडा या चार मार्गांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवून दारूची तस्करी रोखली. जिल्ह्यात परवानाधारक दारूचे चार कारखाने आहेत. त्यामध्ये कोल्हापूर शहरात मार्केट यार्डमध्ये दोन, कबनूर (ता. कागल) येथे दोन आहेत. जिल्ह्यात होलसेल विक्रेते १५, तर मोठे किरकोळ विक्रेते आठ आहेत. येथून ही दारू कोल्हापूरसह सांगली व सातारा या ठिकाणी विक्रीसाठी जात असते. जिल्ह्यातील परवानाधारक ३२५ देशी दारूची दुकाने आहेत. तर ३५० बीअर बार आहेत. त्यानुसार महिन्याला नऊ लाख लिटर दारूची विक्री केली जाते. वर्षाला दारूच्या उत्पादनातून प्रशासनाला १४५ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होतो. लोकसभा निवडणुकीत दारूची प्रचंड विक्री झाल्याने उत्पादन शुल्क विभागाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळाला होता. विधानसभा निवडणुकीत मात्र दारूचा पूर ओसरल्याने जादा महसूल बुडाला. गोव्याहून येणाऱ्या चंदगड-आंबोली, कर्नाटक-कागल, राधानगरी-फोंडा आणि गगनबावडा या चार मार्गांवर सुमारे १८ लाखांची दारू पकडण्यात आली. त्यामध्ये तस्करीबहाद्दरांवर २८९ गुन्हे दाखल करून ४६ जणांना अटक केली. विधानसभा निवडणूक काळात देशी-विदेशी दारूची तस्करी रोखण्यात उत्पादन शुल्क विभागाला यश आले. लोकसभा निवडणुकीमध्ये परवानाधारक दारूची विक्री मोठ्या प्रमाणात झाली होती. विधानसभा निवडणुकीत मात्र ती अत्यंत कमी झाली. - राजेश कावळे : अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, कोल्हापूर दारूची विक्री कमी झाल्याने महसुलात घट १८ लाखांची दारू जप्त १८९ जणांवर गुन्हे ४६ आरोपींना अटक