शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील पूर ओसरला; अद्याप २३ बंधारे पाण्याखाली, पडझडीत लाखांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 14:25 IST

पावसाचा जोर ओसरला असला तरी पूर्णपणे उघडीप नाही

कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी उघडझाप असली तरी अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. धरण क्षेत्रातही पाऊस असल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. राधानगरी धरणाचे बंद झालेले तीन स्वयंचलित दरवाजे पुन्हा उघडले होते. मात्र, दुपारी चार वाजता एक दरवाजा बंद झाल्याने त्यातून प्रतिसेकंद ४२५६ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगेची पातळी दिवसभरात दोन फुटाने कमी झाल्याने पुराचे पाणी हळूहळू पात्रात जाऊ लागले आहे.गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला असला तरी पूर्णपणे उघडीप नाही. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सकाळपासूनच अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड व चंदगड तालुक्यात तुलनेत पाऊस अधिक आहे. गेले दोन दिवस पाऊस कमी राहिल्याने धरणातील विसर्ग कमी झाला होता.

‘राधानगरी’चे सहा दरवाजे बंद झाले होते. मात्र, मंळवारी धरण क्षेत्रातही चांगला पाऊस कोसळत राहिल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. या धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले असून, त्यातून प्रतिसेकंद ४२५६ घनफूट, तर वारणा धरणातून ५९७५ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीची पातळी ३१.९ फुटांवर असून अद्याप २३ बंधारे पाण्याखाली आहेत. दोन राज्य व एक प्रमुख जिल्हा मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद आहे.

पडझडीत ८.४० लाखांचे नुकसानजिल्ह्यात मंगळवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत २१ खासगी मालमत्तांची पडझड झाली आहे. त्यामुळे ८ लाख ४० हजारांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसfloodपूरriverनदी