शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

महापुराचा धोका कायम, दिवसभरात पंचगंगा नदीच्या पातळीत अर्ध्या फुटाने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2024 06:28 IST

शिरोळ तालुक्याला पुराचा विळखा

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर ओसरला आहे. धरणक्षेत्रात पाऊस सुरू असल्याने विसर्ग कायम राहिल्याने पाण्याची पातळी हळूहळू वाढत आहे. पंचगंगेची पातळी दिवसभरात केवळ अर्ध्या फुटाने वाढली असून, सध्या ४७.६ फूट पाणीपातळी आहे.  जिल्ह्यातील ९८ बंधारे पाण्याखाली असून ८८ मार्ग बंद आहेत. 

पूरग्रस्तांच्या स्थलांतराचे काम वेगाने सुरू केले आहे. शिरोळ, नृसिंहवाडी, कुरुंदवाड परिसरात पुराच्या पाण्याने विळखा घातला आहे. पाऊस जरी कमी झाला असला, तरी प्रशासन सतर्क असून, पुराच्या पातळीवर नजर ठेवून आहे. कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी जयंती नाल्याचे पाणी शिरल्याने रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. 

सांगलीत शनिवारी कृष्णा नदीच्या  पातळीत माेठी वाढ झाल्याने काेणत्याही आपत्कालीन स्थितीचा सामना करण्यासाठी लष्कराच्या तुकड्यांना पाचारण करण्यात आले. कोयना धरण ७८.८४ टक्के भरल्यामुळे धरणाचे चार दरवाजे उघडून ३२ हजार १०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. 

पुराचा गावाला वेढा, गर्भवती नावेतून रुग्णालयात

गडचिरोली/नागपूर : गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीचे थैमान सुरूच असून,   सिरोंचा तालुक्यातील कर्जेली गावालाही २६ जुलैला पुराने वेढा टाकला. यावेळी एका गर्भवतीला नावेतून रुग्णालयात पोहोचविण्यात आले. त्यामुळे ती सुखरूप दवाखान्यात भरती झाली. पुरामुळे जनजीवन प्रभावित झाले आहे. दहा-बारा दिवसांपासून विदर्भात थैमान घालणारा पाऊस थांबण्याची चिन्हे नाहीत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढचे चार दिवस ३१ जुलैपर्यंत विदर्भात जाेरदार पावसाची शक्यता कायम आहे. यात २९ व ३० जुलै राेजी विजांचा कडकडाटही हाेण्याची शक्यता आहे.   

रत्नागिरीत उसंत घेत पावसाचा दिलासा

रत्नागिरी : रेड अलर्ट असतानाही शुक्रवारी पावसाने सर्वच तालुक्यांमध्ये उसंत घेत विश्रांती घेतली आहे. शनिवारीही सकाळी पावसाने उघडीप दिली होती. त्यानंतर पुन्हा जोरदार पाऊस पडेल, असे वाटत होते. परंतु हलक्या किरकाेळ सरी वगळता पावसाने विश्रांती घेतली होती. 

सिंधुदुर्गात संततधार सुरूच, घरांचे नुकसान 

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे. संततधार पाऊस कोसळत नसला तरी वादळवाऱ्यासह बरसत असल्याने झाडे पडून, घरांची छप्परे उडून मोठे नुकसान होत आहे.

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूर