उद्धव ठाकरे यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन, भेटण्यासाठी झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 15:20 IST2020-01-18T15:19:17+5:302020-01-18T15:20:30+5:30

कोल्हापुरच्या श्री अंबाबाई मंदिरात शनिवारी सकाळी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  श्री अंबाबाईचे दर्शन घेतले.

Flock to meet Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन, भेटण्यासाठी झुंबड

उद्धव ठाकरे यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन, भेटण्यासाठी झुंबड

ठळक मुद्देउद्धव ठाकरे यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शनसयाजी हॉटेलमध्ये ठाकरे यांना भेटण्यासाठी झुंबड

कोल्हापूर : कोल्हापुरच्या श्री अंबाबाई मंदिरात शनिवारी सकाळी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  श्री अंबाबाईचे दर्शन घेतले.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच कोल्हापूर दौऱ्यावर आले असल्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाच वातावरण होते. शनिवारी सकाळी सयाजी हॉटेलमध्ये त्यांना भेटण्यासाठी झुंबड उडाली. शिवसेनेचे आजी-माजी आमदार, पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक, नागरीकांनी सकाळी आठ वाजल्यापासून येथे गर्दी करण्यास सुरु केले.

सकाळी साडे नऊच्या सुमारास मुख्यमंत्री ठाकरे अंबाबाई मंदिरात जाण्यासाठी बाहेर आल्यानंतर त्यांना भेटण््यासाठी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली.

दरम्यान, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैयशील माने, उद्योजक संजय घोडावत, आण्णासाहेब पाटील महामंडळाचे उपाध्यक्ष शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हा प्रमुख विजय देवणे, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार चंद्रदिप नरके, माजी आमदार सुजित मिणचेकर, संग्रामसिंह कुपेकर, सुरेशदादा पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली.

यावेळी शिवसैनिकांनी जय भवानी, जय शिवाजी, उद्धव ठाकरे तुम्ह आगे बडो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

 

Web Title: Flock to meet Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.