शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

निवास साळोखे-टोल कर्मचाऱ्यांत चकमक

By admin | Updated: December 7, 2014 00:55 IST

शाहू टोल नाक्यावरील घटना : प्रकार झाला नसल्याचा पोलिसांचा दावा

कोल्हापूर : टोल न देण्यावरून शाहू टोलनाक्यावर सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे व कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक होऊन दमदाटीचा प्रकार काल, शुक्रवारी रात्री घडला. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित अजित सुधाकर देवकर (वय २१, रा. शास्त्रीनगर) याचा या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचे निष्पन्न झाले असल्याचे पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांनी सांगितले. याबाबत पोलिसांनी सांगितले की, टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे हे कुटुंबीयांसमवेत चारचाकीमधून निपाणी येथे कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रम आटोपून ते कोल्हापूरला काल रात्री येत होते. ही गाडी शाहू टोलनाक्यावर आल्यावर कर्मचाऱ्यांनी साळोखे यांच्याकडे टोलची मागणी केली, पण साळोखे यांनी टोल देण्यास नकार दिला. दरम्यान, साळोखे यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संशयित अजित देवकर याला ताब्यात घेतले. हा प्रकार समजताच टोलविरोधी कृती समितीचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात आले. त्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. पोलिसांनी संशयितांची चौकशी करून सीसीटीव्ही फुटेज पाहिले. पण, त्यामध्ये असा प्रकार झाला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी संशयिताला सोडून दिले. दरम्यान, या प्रकाराबाबत निवास साळोखे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, टोलवरून वादावादी झाली. त्यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. परंतू, याबाबतची तक्रार पोलिसांकडे तोंडी स्वरूपात केली होती.