शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

कोल्हापूर-मुंबई विमानाचे महिन्यानंतर उड्डाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:55 AM

< p >कोल्हापूर : तांत्रिक कारणामुळे एअर डेक्कन कंपनीने थांबविलेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा रविवारपासून सुरू झाली. एक महिन्यानंतर कोल्हापुरातून विमानाने उड्डाण (टेकआॅफ) केले. कंपनीतर्फे पूर्वीच्या वेळापत्रकानुसार आठवड्यातील मंगळवार, बुधवार आणि रविवारी सेवा पुरविण्यात येणार आहे.केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत कोल्हापूर-मुंबई विमानसेवा एअर डेक्कन कंपनीने १७ एप्रिलपासून सुरू केली. तिला कोल्हापुरातून चांगला प्रतिसाद ...

<p>कोल्हापूर : तांत्रिक कारणामुळे एअर डेक्कन कंपनीने थांबविलेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा रविवारपासून सुरू झाली. एक महिन्यानंतर कोल्हापुरातून विमानाने उड्डाण (टेकआॅफ) केले. कंपनीतर्फे पूर्वीच्या वेळापत्रकानुसार आठवड्यातील मंगळवार, बुधवार आणि रविवारी सेवा पुरविण्यात येणार आहे.केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत कोल्हापूर-मुंबई विमानसेवा एअर डेक्कन कंपनीने १७ एप्रिलपासून सुरू केली. तिला कोल्हापुरातून चांगला प्रतिसाद मिळाला. तांत्रिक कारणामुळे २६ जूनपासून उड्डाणे रद्द केली. कंपनीकडून पहिल्यांदा १० जून आणि त्यानंतर १५ जूनला सेवा सुरू होणार असल्याचे खासदार महाडिक यांना सांगण्यात आले; पण तांत्रिक कारणामुळे सेवा सुरू झाली नाही.याबाबत प्रवाशांसह कोल्हापूरकरांतून नाराजी व्यक्त झाली. त्यावर खासदार संभाजीराजे आणि खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्ली येथे नागरी हवाई वाहतूक मंत्रालय, एअर डेक्कन कंपनी यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यात खासदार संभाजीराजे यांनी २७ जुलैला ‘एअर डेक्कन’समवेत चर्चा केली. त्यावर कंपनीने रविवार (दि. २९) पासून मुंबई-कोल्हापूर विमानसेवा सुरू करीत असल्याचे पत्र त्यांना दिले. यानुसार रविवारपासून विमानसेवा सुरू झाली. दुपारी अडीच वाजता विमान हे कोल्हापूर विमानतळावर आले. दुपारी तीन वाजता येथून मुंबईच्या दिशेने त्याने उड्डाण केले. विमानसेवा पूर्ववत सुरू झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.कोल्हापूर-मुंबई सेवा आठवडाभर सुरू राहण्यासाठी अन्य काही कंपन्यांशी चर्चा करणार आहे. त्यासह केंद्रीय विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेणार आहे.- खासदार धनंजय महाडिकमी केलेल्या मागणीनंतर एअर डेक्कन कंपनीने रविवारपासून विमानसेवा सुरू करून शब्द पाळल्याचा आनंद आहे. ही विमानसेवा नियमितपणे सुरू ठेवावी, इतकी अपेक्षा आहे.- खासदार संभाजीराजे