शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’मध्ये विश्वास राऊत यांच्याहस्ते ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:08 IST

कोल्हापूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘लोकमत’च्या शिरोली औद्योगिक वसाहतीतील मुख्य कार्यालयात ज्येष्ठ कर्मचारी विश्वास राऊत यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. देशप्रेमाने भारावलेल्या ...

कोल्हापूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘लोकमत’च्या शिरोली औद्योगिक वसाहतीतील मुख्य कार्यालयात ज्येष्ठ कर्मचारी विश्वास राऊत यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. देशप्रेमाने भारावलेल्या वातावरणात हा सोहळा झाला.

स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाचा सोहळा ‘लोकमत’मध्ये उत्साही वातावरणात साजरा केला जातो. एरवीही वर्षभर भारताची शान असलेला तिरंगा ‘लोकमत’च्या मुख्यालयावर डौलाने फडकत असतो. मुख्यालयाच्या आवारात सुंदर रांगोळी रेखाटली होती. देशभक्तिपर गीतांनी वातावरण भारावलेले होते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त ज्यांना ध्वजारोहणाचा मान मिळाला, ते राऊत मूळचे सांगलीचे असून मुद्रितशोधक म्हणून ‘लोकमत’मध्ये गेले एक तप ते काम करीत आहेत. त्यांच्याहस्ते महात्मा गांधी आणि स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी स्वागत केले. ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत झाले. सर्वांनी भारतमातेचा जय-जयकार केल्यावर हा सोहळा संपला. यावेळी ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

२७०१२०२१-कोल-लोकमत ध्वजारोहण

कोल्हापुरात ‘लोकमत’च्या शिरोली औद्योगिक वसाहतीतील मुख्यालयात ज्येष्ठ कर्मचारी विश्वास राऊत यांच्याहस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण झाले. देशभक्तीने भारावलेल्या वातावरणात हा सोहळा झाला. (नसीर अत्तार)