शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार बालकांना मिळाली शिक्षणाची ‘उमेद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 00:53 IST

आई-वडील हयात नाहीत अशा गरजू मुला-मुलींची शाळांमधून माहिती घेऊन त्यांना दप्तरासह शैक्षणिक साहित्य या फौंडेशनच्यावतीने दिले जाते. ऊसतोड कामगारांची मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावीत यासाठी त्यांना त्यांच्या पालांमध्ये जाऊन शिक्षण देण्याचा प्रयत्न आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त दालमिया साखर कारखाना येथे केला आहे.

ठळक मुद्देसांगरुळमधील उमेद फौंडेशन : शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न; विविध सामाजिक उपक्रम

संतोष मिठारी ।कोल्हापूर : आर्थिक दुर्बलता, भौगोलिक दुर्गमता, आदी विविध कारणांमुळे अनेक बालकांचे जगणे कठीण बनते. असे कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये या हेतूने सांगरुळ (ता. करवीर) येथील उमेद फौंडेशन गेल्या पाच वर्षांपासून विविध उपक्रम राबवत आहेत. त्याच्या माध्यमातून आतापर्यंत समाजातील वंचित, उपेक्षित सुमारे पाच हजार बालकांना शिक्षणाबरोबरच जगण्याची ‘उमेद’ मिळाली आहे. कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सांगली आणि जालनामधील या वंचित बालकांच्या आयुष्यात आनंद फुलविण्याचे काम या फौंडेशनने केले आहे.

आई-वडील हयात नाहीत अशा गरजू मुला-मुलींची शाळांमधून माहिती घेऊन त्यांना दप्तरासह शैक्षणिक साहित्य या फौंडेशनच्यावतीने दिले जाते. ऊसतोड कामगारांची मुले शिक्षणाच्या प्रवाहात यावीत यासाठी त्यांना त्यांच्या पालांमध्ये जाऊन शिक्षण देण्याचा प्रयत्न आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त दालमिया साखर कारखाना येथे केला आहे. कोपार्डे (ता. करवीर) येथील माळावर ‘शिक्षण आले अंगणी’ या संकल्पनेतून ‘ज्ञानांगण’ ही बिनभिंतीची शाळा भरविली जाते. त्याद्वारे चार वर्षांमध्ये ५० बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. जी बालक आणि ज्यांचे पालक कचरा अथवा भंगार वेचक म्हणून काम करतात अशा मुलांसाठी शाहूवाडी येथे उमेद शिक्षण केंद्रामार्फत सायंकाळी वर्ग चालवले जातात. या केंद्रात ४५ मुले-मुली आहे. विविध शाळांमध्ये बाल हक्क मंच स्थापन केले असून त्यामध्ये ८०० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी आहेत.

दुर्गम भागातील आंबर्डे, आयरेवाडी, बर्की (ता. शाहूवाडी), जाधववाडी (ता. पन्हाळा) तसेच जालना जिल्ह्यामध्ये सायंअभ्यासिकेचा रोज तीनशे विद्यार्थी मोफत लाभ घेतात. ‘ज्ञानसेतू’ या उपक्रमांमार्फत विद्यार्थ्यांची क्षेत्रभेटी, विविध कौशल्य शिकवली जातात. गरजू मुलांच्या शिक्षणाची व संगोपन जबाबदारी घेत ‘उमेद मायेचं घर’ या खासगी वसतिगृहाची स्थापना केली आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या गरजू मुलांना प्रवास, परीक्षा शुल्क, जेवण आदींकरिता आर्थिक मदत पुरविली जाते.२५० हून अधिक स्वयंसेवक कार्यरतआपल्या बालपणी जे दु:ख, यातना आल्या, त्या इतर मुलांच्या आयुष्यात येऊ नयेत, या हेतूने उमेद फौंडेशनची स्थापना केली आहे. प्रत्येक बालकांच्या आयुष्यात शिक्षणाची ‘उमेद’ निर्माण करण्यासाठी काम करण्याचे ध्येय घेऊन आम्ही २५० कार्यकर्ते, स्वयंसेवक कार्यरत आहोत. सामाजिक सुहृदयी देणगीदारांच्या मदतीने हे सामाजिक कार्य करण्यात येत आहे, असे या फौंडेशनचे अध्यक्ष प्रकाश गाताडे यांनी सांगितले. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchildren's dayबालदिन