शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
2
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
3
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
4
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
5
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
6
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
7
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
8
PHOTOS : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना; पहिल्या बॅचमध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही
9
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
10
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
11
"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला
12
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
13
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
14
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
15
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
16
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
17
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
18
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
19
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
20
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी

प्राध्यापकांच्या विविध मागण्यासाठी पाच टप्प्यात आंदोलन, राज्यातील १५ हजार प्राध्यापक सहभागी होणार

By संदीप आडनाईक | Published: January 30, 2024 6:53 PM

कोल्हापूर : राज्य सरकारकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करुनही प्राध्यापकांच्या मागण्या आणि विविध प्रश्न सुटलेले नाहीत. महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने सातत्याने पाठपुरावा ...

कोल्हापूर : राज्य सरकारकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करुनही प्राध्यापकांच्या मागण्या आणि विविध प्रश्न सुटलेले नाहीत. महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने सातत्याने पाठपुरावा करुनही शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोग्याच्या नियमावलींमधील तरतुदींची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी राज्यातील १५ हजार प्राध्यापक महासंघाच्या नेतृत्वाखाली पाच टप्प्यात आंदोलन करणार आहेत, अशी माहीती एमफुक्टोचे उपाध्यक्ष डॉ. आर. के. चव्हाण आणि डॉ. डी. एन. पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावलीनुसार १८ जुलै २०१८ मधील बंधनकारक तरतुदींशी विसंगत तरतुदी शासन निर्णयात अंतर्भुत केल्या आहेत. त्या तरतुदी अवैधानिक आणि बेकायदेशीर असल्याने त्या रद्द कराव्यात, शिक्षकांना पात्र झाल्यापासून पदोन्नती मिळावी, पीएचडी, एमफिलच्या प्रोत्साहन वेतनवाढी मिळाव्यात, शिक्षकांच्या ९० टक्के जागा भराव्यात, कंत्राटी किंवा सीएचबी शिक्षकांना नियमित शिक्षकापेक्षा कमी वेतन नसावे, रिफ्रेशन, ओरिएंटेशन कोर्सेससाठी युजीसी नियमावलीमधील मुदतवाढ ग्राह्य धरावी, तसेच समग्र योजना कोणतीही बदल न करता लागू करावी, सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एमफील धारकांना पदाेन्नतीचे लाभ मिळावेत, व त्यांचा छळ थांबवावा, आंदोलन काळातील ७१ दिवसाचे थकीत वेतन कपातीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी व उर्वरित व्याजाची रक्कम विनाविलंब मिळावी, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मंत्रालय पातळीवर तक्रार निवारण यंत्रणा प्रस्थापित करावी, नेटसेटमुक्त शिक्षकांना नेमणुकीच्या तारखेपासून जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह प्राध्यापकांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र प्राध्यापक महासंघातर्फे (एमफुक्टो) हे पाच टप्प्यात आंदोलन पुकारले आहे. याशिवाय राज्यपाल, मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्र्यांना ईमेलद्वारे निवेदन देण्यात येणार आहे. ३० एप्रिलपूर्वी सकारात्मक निर्णय न घेतल्यास असहकार आंदोलन पुकारण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.या आंदोलनात शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाचा (सुटा) सहभाग आहे. एमफुक्टोने घेतलेल्या निर्णयानुसार सुटातर्फे आंदोलन होईल. यामध्ये प्राध्यापकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन ‘सुटा’चे प्रमुख कार्यवाह डॉ. डी. एन. पाटील, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष डॉ. आर. के. चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केले.

असे आहेत टप्पे

  • २६ फेब्रुवारी : काळ्या फीती लावणे
  • ४ मार्च : विभागीय सहसंचालक कार्यालयावर मोर्चा, धरणे
  • २७ मार्च : राज्यातील विविध विद्यापीठांवर मोर्चा, धरणे
  • १५ एप्रिल : शिक्षण संचालक, पुणे कार्यालयावर मोर्चा, धरणे
टॅग्स :kolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठ