शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Warkari accident near Sangola: एकाच चितेवर पाच जणांचे अंत्यसंस्कार; जठारवाडी शोकमग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 14:08 IST

आयुष्यभर विठ्ठल नामाचा जप करणाऱ्या आपल्याच बांधवाना अखेरचा निरोप देण्यासाठी उभे जठारवाडी गाव टाळ मृदुंगाचा गजर करत अंत्ययात्रेत सामील झाले होते.

पोपट पवारकोल्हापूर : एरव्ही टाळ मृदुंगाचा गजर सुरू झाला की उभा गाव त्यात तल्लीन व्हायचा, लहान थोरासह  सगळ्यांचीच पावले गावचे शक्तीपीठ असलेल्या विठ्ठल मंदिराकडे आपसूकच वळायची. आज मंगळवारीही टाळ मृदुंगचा गजर उभ्या शिये-जठारवाडी परिसरात घुमला खरा, मात्र, या आवाजाला अश्रूंची किनार होती. आयुष्यभर विठ्ठल नामाचा जप करणाऱ्या आपल्याच बांधवाना अखेरचा निरोप देण्यासाठी उभे जठारवाडी गाव टाळ मृदुंगाचा गजर करत अंत्ययात्रेत सामील झाले होते.   जुनोनी(ता.सांगोला) या गावाजवळ वारकऱ्यांच्या दिंडीत कार घुसून झालेल्या अपघातात करवीर तालुक्यातील जठारवाडी येथील पाच जणांचा तर वळीवडे येथील दोघा मायलेकरांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांचे पार्थिव मंगळवारी पहाटे जठारवाडी गावात पोहोचले. यावेळी ट्रॅक्टर ट्रॉलीत पाचही जणांचे पार्थिव ठेवत टाळ मृदुंगाच्या गजरात त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.  यातील जठारवाडी येथील ४ महिला व एक पुरुष अशा पाच जणांवर मंगळवारी सकाळी आठ वाजता शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच ठिकाणी रचण्यात आलेल्या चितेवर पाचही जणांचे अंत्यसंस्कार होताना उभा गाव अश्रूंनी डबडबला होता.जठारवाडी येथील ३५ जणांची दिंडी आठ दिवसांपूर्वी गावातून पंढरपूरकडे रवाना झाली. ही दिंडी  सोमवारी सायंकाळी जुनोनी गावाजवळून जात असताना अचानक पाठीमागून आलेली कार या दिंडीत घुसली. यात सात जण ठार झाले. त्यामध्ये महिलांची संख्या अधिक होती. शारदा आनंदा घोडके (वय ६१), रंजना बळवंत जाधव (५५), सुनिता पवार, गौरव पवार (१४), सर्जेराव श्रीपती जाधव (५२), सुनीता सुभाष काटे (५०), शांताबाई शिवाजी जाधव (६२) अशी मृतांची नावे आहेत. यापैकी सुनिता पवार आणि गौरव पवार हे मायलेक असून ते जठारवाडी इथले पाहुणे आहेत. ते मूळचे वळीवडे गावचे रहिवासी आहेत.                विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीत काल, सोमवारी सायंकाळी कार घुसल्याने झालेल्या भीषण अपघातात सात वारकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यापैकी सहा जणांचा जागीच, तर एका वारकऱ्याचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. या अपघातात पाच वारकरी जखमी झाले आहे. जखमी वारकऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातातील कार सांगोला तालुक्यातील सोनंद गावातील असून यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक, करवीरच्या तहसीलदार शीतल मुळे भांबरे यांनी अंत्यसंस्कारावेळी उपस्थित राहत मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातSolapurसोलापूर