शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

स्वनिधीचा निर्णय झाल्यावरच पाच जणांनी दिले राजीनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जादा स्वनिधी आणि थांबवलेल्या कामांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जादा स्वनिधी आणि थांबवलेल्या कामांना मंजुरी दिल्यानंतरच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्यासह सभापती हंबीरराव पाटील, प्रवीण यादव, डाॅ. पद्माराणी पाटील आणि स्वाती सासने यांनी अखेर बुधवारी राजीनामे दिले. त्यासाठी संध्याकाळी साडेसहापर्यंत अध्यक्ष बजरंग पाटील यांना तिष्ठत बसावे लागले.

सर्व काही ठरल्यानुसार करण्यासाठी अर्जुन आबिटकर, अमर पाटील आणि शशिकांत खोत यांच्या तोंडाला फेस यायची वेळ आली. दिवसभर जिल्हा परिषदेतील विविध दालनात, नंतर पदाधिकाऱ्यांच्या बंगल्यावर, अखेर अध्यक्षांच्या दालनात अशा विविध बैठका झाल्यानंतर मग चार जणांनी प्रत्यक्ष राजीनामे दिले. सासने यांचाही राजीनामा देण्यात आला. परंतू त्या शेवटपर्यंत जिल्हा परिषदेकडे फिरकल्या नाहीत. त्यांनी फोनवरूनच निरोप दिला.

शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरूण दूधवडकर यांच्यासोबतच्या बैठकीमध्ये ठरल्यानुसार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची थांबवलेली कामे मंजूर केल्यानंतर राजीनाम्याचा निर्णय ठरला होता. अशातच उपाध्यक्ष पाटील यांचा राजीनामा देण्यासाठी मंगळवारी शशिकांत खोत गेले असता त्यांनी तो स्वीकारला नाही. त्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील यांनी त्यांना बुधवारी सकाळी सुनावले. त्यामुळे पाटील सकाळी साडेअकरापासूनच दालनात थांबून होते.

दुपारनंतर सासने वगळता सर्व पदाधिकारी जिल्हा परिषदेत आले. आबिटकर आणि खोत या सर्वांशी चर्चा करत होते. साडे चार नंतर उपाध्यक्ष पाटील, प्रवीण यादव, हंबीरराव पाटील, राजेश पाटील सभापती बंगल्यावर गेले. तेथे साधकबाधक चर्चा करून सर्वजण साडे पाचच्या दरम्यान अध्यक्षांच्या दालनात आले. तेथे पुन्हा सविस्तर चर्चा झाली. राजीनामे देणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या स्वनिधीचा मुद्दा सोडवण्यात आला. तशी मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांच्याशी फोनवरून चर्चा झाली. मगच अर्थ समितीचे सभापती असलेले यादव सर्वात शेवटी बैठकीच्या ठिकाणी आले आणि मगच सर्वांनी अध्यक्ष पाटील यांच्याकडे राजीनामे दिले.

चौकट

हे ठरल्यानंतरच झाले राजीनामे

हंबीरराव पाटील यांच्या ३५ लाखांच्या कामांना मान्यता

प्रवीण यादव यांच्या शिक्षण विभागाच्या स्वनिधीतील २५ लाखांच्या कामांना मान्यता अध्यक्ष बजरंग पाटील यांना १५ लाख जादा स्वनिधी उपाध्यक्ष सतीश पाटील, प्रवीण यादव यांना प्रत्येकी १० लाख जादा स्वनिधी हंबीरराव पाटील, डॉ. पद्माराणी पाटील आणि स्वाती सासने यांना ५ लाख जादा स्वनिधी स्वाती सासने यांच्या दलित वस्तीतील कामांना धक्का नाही.

अर्थ समितीच्या सर्व सदस्यांना जादा ३ लाख निधी सर्व सदस्यांना ७ लाखांचा स्वनिधी ??????

चौकट

रुग्णालयातच घेतला अध्यक्षांचा राजीनामा

अध्यक्ष बजरंग पाटील यांचा राजीनामा ते कोरोनो पॉझिटिव्ह म्हणून रुग्णालयात दाखल झाले होते तेव्हाच घेतला आहे. आता तो त्यांनी फक्त प्रत्यक्ष पुण्याला जावून विभागीय आयुक्तांना द्यायचा आहे की यासाठी प्राधिकृत म्हणून कोणाची नियुक्ती होणार आहे याचा निर्णय गुरुवारी किंवा शुक्रवारी होईल.

चौकट

सभापतींच्या राजीनाम्यावर आज कार्यवाही

उपाध्यक्षांसह चारही सभापतींचे राजीनामे झाले तेव्हा सायंकाळी साडेसहानंतरही सामान्य प्रशासन विभागाची यंत्रणा तयार होती. मात्र आता हे राजीनामे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्फत गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात येतील. अध्यक्षांचा राजीनामा झाल्यानंतर मग नव्या निवडीसाठी प्रक्रिया सुरू होईल.

चौकट

आधी मंजुरीची पत्रे

ज्या कामांना अध्यक्षांनी थांबवण्याची पत्रे दिली होती. त्या कामांना मंजुरीची पत्रे टाईप करून, त्यावर अध्यक्षांच्या सह्या झाल्यानंरच मग राजीनामे देण्यात आले. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देतानाही आपली चिकाटी सोडली नाही. ठरल्यानुसार झाल्यानंतरच मग राजीनामे दिले. सतीश पाटील आणि पद्माराणी पाटील यांचे मात्र तत्काळ राजीनामे झाले. अध्यक्षांच्या कार्यालयातील सर्व लिपिक, शिपाई सर्वजण सायंकाळी सातपर्यंत याच गडबडीत होते.

चौकट

पालकमंत्र्यांकडून कानउघाडणी

उपाध्यक्ष सतीश पाटील यांचा मंगळवारी दिलेला राजीनामा न स्वीकारल्याबद्दल पालकमंत्री सतेज पाटील यांनी अध्यक्ष बजरंग पाटील यांना सकाळीच सुनावले. त्यामुळे दिवसभर पाटील दालनात बसून होते. ते दुपारी दाढ काढण्यासाठी दवाखान्यात जाणार होते. ते देखील त्यांनी रद्द केले आणि सायंकाळी सहाच्या दरम्यान राजीनामे घेतल्यानंतरच ते बाहेर पडले.