शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

जिल्हा परिषदेचे राजकारण : स्वनिधीचा निर्णय झाल्यावरच पाच जणांनी दिले राजीनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 11:40 AM

Zp Kolhapur : जादा स्वनिधी आणि थांबवलेल्या कामांना मंजुरी दिल्यानंतरच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्यासह सभापती हंबीरराव पाटील, प्रवीण यादव, डॉ. पद्माराणी पाटील आणि स्वाती सासने यांनी अखेर बुधवारी राजीनामे दिले. त्यासाठी संध्याकाळी साडेसहापर्यंत अध्यक्ष बजरंग पाटील यांना तिष्ठत बसावे लागले.

ठळक मुद्देस्वनिधीचा निर्णय झाल्यावरच पाच जणांनी दिले राजीनामेउपाध्यक्षांसह चार सभापतींचा समावेश, दिवसभर काथ्याकुट

कोल्हापूर : जादा स्वनिधी आणि थांबवलेल्या कामांना मंजुरी दिल्यानंतरच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्यासह सभापती हंबीरराव पाटील, प्रवीण यादव, डॉ. पद्माराणी पाटील आणि स्वाती सासने यांनी अखेर बुधवारी राजीनामे दिले. त्यासाठी संध्याकाळी साडेसहापर्यंत अध्यक्ष बजरंग पाटील यांना तिष्ठत बसावे लागले.सर्व काही ठरल्यानुसार करण्यासाठी अर्जुन आबिटकर, अमर पाटील आणि शशिकांत खोत यांच्या तोंडाला फेस यायची वेळ आली. दिवसभर जिल्हा परिषदेतील विविध दालनात, नंतर पदाधिकाऱ्यांच्या बंगल्यावर, अखेर अध्यक्षांच्या दालनात अशा विविध बैठका झाल्यानंतर मग चार जणांनी प्रत्यक्ष राजीनामे दिले. सासने यांचाही राजीनामा देण्यात आला. परंतू त्या शेवटपर्यंत जिल्हा परिषदेकडे फिरकल्या नाहीत. त्यांनी फोनवरूनच निरोप दिला.शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरूण दूधवडकर यांच्यासोबतच्या बैठकीमध्ये ठरल्यानुसार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची थांबवलेली कामे मंजूर केल्यानंतर राजीनाम्याचा निर्णय ठरला होता. अशातच उपाध्यक्ष पाटील यांचा राजीनामा देण्यासाठी मंगळवारी शशिकांत खोत गेले असता त्यांनी तो स्वीकारला नाही. त्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील यांनी त्यांना बुधवारी सकाळी सुनावले. त्यामुळे पाटील सकाळी साडेअकरापासूनच दालनात थांबून होते.दुपारनंतर सासने वगळता सर्व पदाधिकारी जिल्हा परिषदेत आले. आबिटकर आणि खोत या सर्वांशी चर्चा करत होते. साडे चार नंतर उपाध्यक्ष पाटील, प्रवीण यादव, हंबीरराव पाटील, राजेश पाटील सभापती बंगल्यावर गेले. तेथे साधकबाधक चर्चा करून सर्वजण साडे पाचच्या दरम्यान अध्यक्षांच्या दालनात आले. तेथे पुन्हा सविस्तर चर्चा झाली.

राजीनामे देणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या स्वनिधीचा मुद्दा सोडवण्यात आला. तशी मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांच्याशी फोनवरून चर्चा झाली. मगच अर्थ समितीचे सभापती असलेले यादव सर्वात शेवटी बैठकीच्या ठिकाणी आले आणि मगच सर्वांनी अध्यक्ष पाटील यांच्याकडे राजीनामे दिले.हंबीरराव पाटील यांच्या ३५ लाखांच्या कामांना मान्यताप्रवीण यादव यांच्या शिक्षण विभागाच्या स्वनिधीतील २५ लाखांच्या कामांना मान्यता अध्यक्ष बजरंग पाटील यांना १५ लाख जादा स्वनिधी उपाध्यक्ष सतीश पाटील, प्रवीण यादव यांना प्रत्येकी १० लाख जादा स्वनिधी हंबीरराव पाटील, डॉ. पद्माराणी पाटील आणि स्वाती सासने यांना ५ लाख जादा स्वनिधी स्वाती सासने यांच्या दलित वस्तीतील कामांना धक्का नाही.रुग्णालयातच घेतला अध्यक्षांचा राजीनामाअध्यक्ष बजरंग पाटील यांचा राजीनामा ते कोरोनो पॉझिटिव्ह म्हणून रुग्णालयात दाखल झाले होते तेव्हाच घेतला आहे. आता तो त्यांनी फक्त प्रत्यक्ष पुण्याला जावून विभागीय आयुक्तांना द्यायचा आहे की यासाठी प्राधिकृत म्हणून कोणाची नियुक्ती होणार आहे याचा निर्णय गुरुवारी किंवा शुक्रवारी होईल. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूरShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण