शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

स्फोटप्रकरणी पाचजणांवर गुन्हा

By admin | Updated: December 1, 2014 00:39 IST

अवैध साठा केल्याचा आरोप : कारखाना शहराबाहेर हलविण्याची मागणी

विटा : येथील तासगाव रस्त्यावर शनिवारी सकाळी १० वाजता ‘बाबालाल फायर वर्क्स’ या फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटप्रकरणी विटा पोलिसांनी कारखान्याचे मालक मुस्ताकहुसेन अहमद मुल्ला, सादीकहुसेन अहमद मुल्ला, बिलाल मुस्ताकहुसेन मुल्ला, साजिद नजीर शिकलगार व कामगार रियाज गुलाब तांबोळी (सर्व रा. विटा) या पाचजणांविरुध्द गुन्हा दाखल केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून अवैधरित्या स्फोटक वस्तू, फटाक्यांचा साठा केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.विटा येथील नेहरूनगर या भरवस्तीत फटाके तयार करत असताना शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास कारखान्यात अचानक मोठा स्फोट झाला होता. या स्फोटात रियाज तांबोळी, बिलाल मुल्ला व साजिद शिकलगार हे तिघेजण गंभीर जखमी झाले होते. या स्फोटानंतर तरुणांच्या सतर्कतेने कारखान्यातील सुमारे दोन ते तीन ट्रक फॅन्सी फटाक्यांचा साठा बाहेर काढण्यात आला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला होता. येथील बाबालाल फायर वर्क्सचे मालक मुस्ताकहुसेन मुल्ला यांचा कारखाना भरवस्तीत आहे. त्यातच या कारखान्यात शोभेची दारू निर्मिती करण्याचे काम केले जाते. शनिवारीही दारू निर्मिती करतानाच हा स्फोट झाल्याचे घटनास्थळी नागरिकांनी सांगितले. त्यामुळे विटेकर नागरिक आज रविवारी भीतीच्या छायेत वावरत असल्याचे निदर्शनास आले.त्यावेळी नागरी वस्तीत स्फोटक वस्तू ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचा भंग करून जादा फटाक्यांचा साठा व निर्मिती केल्याप्रकरणी मुस्ताकहुसेन मुल्ला, सादीकहुसेन मुल्ला, बिलाल मुस्ताकहुसेन मुल्ला यांच्यासह कारखान्यातील कामगार रियाज तांबोळी व साजिद शिकलगार या पाचजणांविरुध्द शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. (वार्ताहर)