शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

पाच वर्षांत जिल्ह्यात पाचशे बालगुन्हेगारांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:53 IST

इंदुमती गणेश । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : चोरी, मारामारी, चैनीसाठी पाकीटमारी अशा विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वर्षागणीक बालगुन्हेगारीचे प्रमाण ...

इंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : चोरी, मारामारी, चैनीसाठी पाकीटमारी अशा विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वर्षागणीक बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. बाल न्याय मंडळाकडे २०१४ ते १८ या पाच वर्षांत अशी जिल्ह्यातील ५०० हून अधिक प्रकरणे दाखल झाली आहेत. कायद्याने बालगुन्हेगारांना शिक्षाच होत नसल्याने ‘कोणताही गुन्हा केला तरी चालतो,’ या मानसिकतेतून गुन्हेगारी टोळी, कुटुंबातील माणसांकडून गुन्ह्यांसाठी लहान मुलांचा वापर केला जातो.एक गुन्हा पचला की मुलांमध्ये धाडस येते आणि ती गुन्हेगारी मार्गाला लागतात. दुसरीकडे पालकांकडून चैनीसाठी पैसे मिळत नाहीत म्हणूनही गुन्हे करणाऱ्या मुलांची संख्या लक्षणीय आहे. त्यात मुलींचेही प्रमाण ३० ते ४० टक्के आहे. वय वर्षे १४ ते १६ या वयोगटातील मुलांवर चोरी, मारामारी, विनयभंग, बलात्कार, चैनीसाठी मोबाईल, वाहनचोरी, पाकीटमारी, खून-खुनाचा प्रयत्न अशा गंभीर स्वरूपाचे खटले दाखल आहेत.पोलिसांकडून अशी प्रकरणे बाल न्याय मंडळाकडे येते. गुन्हा किरकोळ असेल तर समुपदेशन, पालकांच्या जामिनावर सोडले जाते; पण तो गंभीर असेल तर त्या मुलाची बालनिरीक्षणगृहात रवानगी जाते. सध्या निरीक्षणगृहात अशी १६ ते २० मुले आहेत. जी मुले चुकून किंवा परिस्थितीने गुन्ह्यात अडकतात ती सुधारतात; पण जी मुले मुळातच गुन्हेगारी पार्श्वभूमीतील असतात ती सुधारत नाहीत, असा अनुभव आहे.तीनशे प्रकरणे प्रलंबितमुलं पळून जाणे, समन्स लागू न होणे, साक्षीदार नसणे, मुले सज्ञान होणे, पालक हजर नसणे अशा कारणांमुळे वर्षानुवर्षे खटले सुरूच राहतात. बाल न्याय मंडळाकडून आठवड्यातून दोन दिवस न्यायालय चालविले जाते. हा वेळ कायदेशीर प्रक्रियेत निघून जातो. येणारी प्रकरणे आणि मिळणारा वेळ यांत व्यस्त प्रमाण आहे. परिणामी बाल न्याय मंडळाकडे जवळपास ३०० प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे राज्यातील ३६ जिल्ह्यांत पूर्णवेळ न्यायालय व्हावे, अशी मागणी आहे.पाठपुराव्याचा अभावबालगुन्हेगारांचे पुढे काय होते, याचा पाठपुरावा करणारी सक्षम यंत्रणा शासनाकडे नाही. निरीक्षणगृहानंतर ती कोणत्या वातावरणात जातात, पालकांकडे सुरक्षित आहेत का, त्यांच्या पुनर्वसनासाठी काही सोईसुविधा देता येईल का, याबाबत निर्णय घेऊन काम करणारी यंत्रणा नसल्याने अशा मुलांचे पुढे काय होते, या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच येते.