शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

‘लोकमत महामॅरेथॉन’च्या नावनोंदणीसाठी उरले पाच दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 4:33 PM

    कोल्हापूर : सुदृढ आरोग्यासाठी ‘क्रॉस द लाईन’ या टॅगलाईनने कोल्हापुरात होणाऱ्या या वर्षीच्या ‘ लोकमत महा मॅरेथॉन’मधील ...

ठळक मुद्दे‘लोकमत महामॅरेथॉन’च्या नावनोंदणीसाठी उरले पाच दिवसधावपटूंना मिळणार आकर्षक मेडल; सहा लाखांची बक्षिसे जिंकण्याची संधी

 

 

कोल्हापूर : सुदृढ आरोग्यासाठी ‘क्रॉस द लाईन’ या टॅगलाईनने कोल्हापुरात होणाऱ्या या वर्षीच्या ‘लोकमत महामॅरेथॉन’मधील सहभागासाठी नावनोंदणी करण्याकरिता अवघे पाच दिवस उरले आहेत. नावनोंदणीची अंतिम मुदत शनिवार (दि. २१) पर्यंत आहे. दि. ५ जानेवारी २०२० रोजी होणाऱ्या महामॅरेथॉनमधील धावपटूंना आकर्षक मेडल मिळणार आहे. विविध पाच गटांमध्ये होणाऱ्या मॅरेथॉनमधील विजेत्यांना एकूण सहा लाखांची बक्षिसे जिंकण्याची संधी आहे.येथील पोलीस क्रीडांगणातून ५ जानेवारीला पहाटे पाच वाजता ‘लोकमत मॅरेथॉन’ची सुरुवात होणार आहे. या महामॅरेथॉनमध्ये १२ वर्षांपेक्षा जास्त आणि धावण्याचा छंद असणाऱ्यांसाठी ‘फन रन’, १६ वर्षांपेक्षा जास्त वर्षांवरील व्यक्तींसाठी १० किलोमीटरची ‘पॉवर रन’ होणार आहे. १८ वर्षांवरील व्यक्तींसाठी २१ किलोमीटरचा गट आणि तीन किलोमीटरची ‘फॅमिली रन’ आणि पाच किलोमीटर अंतराचा स्वतंत्र गट आहे.

सर्व वयोगटांतील व्यक्तींना त्यामध्ये सहभागी होता येईल. सैन्य आणि पोलीस दलातील धावपटूंसाठी २१ किलोमीटरचा ‘डिफेन्स’ हा वेगळा गट आहे. लोकप्रियतेचे शिखर गाठलेल्या या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी धावपटू, नागरिकांनी त्वरित नावनोंदणी करावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी येथे संपर्क साधाया महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी वेबसाईटवर आॅनलाईन रजिस्ट्रेशन करता येईल किंवा लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर; मोबाईल नंबर ९६३७३३०७०० अथवा ९७६७२६४८८५ वर संपर्क साधावा. या महामॅरेथॉनच्या ‘सीझन-२’ ला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता पुन्हा एकदा कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्र मॅरेथॉनमय होणार आहे.

ग्रुप रजिस्ट्रेशन करण्याची संधीवैयक्तिक आणि ग्रुपच्या स्वरूपात धावपटू, नागरिकांना या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होता येईल. सहभागी होणाऱ्यांना ग्रुप रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध आहे. कोल्हापूरमधील या महामॅरेथॉनच्या ‘सीझन-३’साठी लवकरात लवकर नोंदणी करा.प्रकार (अर्ली बर्ड शुल्क) असे मिळणार साहित्य

  • ३ किलोमीटर (फॅमिली रन) ४०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, मेडल, ब्रेकफास्ट
  • ५ किलोमीटर (फन रन) ५०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, मेडल, ब्रेकफास्ट
  • १० किलोमीटर (पॉवर रन) ११०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट
  • २१ किलोमीटर (हाफ मॅरेथॉन) ११०० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट
  • २१ किलोमीटर (डिफेन्स गट) १००० रुपये टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल, टाईम चिप, ब्रेकफास्ट

 

‘लोकमत महामॅरेथॉन’चे तिसरे पर्वदेखील मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीस या महामॅरेथॉनमध्ये धावून आयुष्यभर सुदृढ राहण्याची शपथ मी आणि माझी टीम घेणार आहे. आरोग्यदृष्ट्या सुदृढ राहण्याचा संकल्प आपण सर्वांनी करून सहभागी होऊया आणि उद्याचा सशक्त भारत घडवूया. मनोरंजन, स्वास्थ्य, सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन’ला आमच्या हार्दिक शुभेच्छा!- मुकेश भंडारी,डायरेक्टर, माय ड्रीम्स होंडा, कोल्हापूर.

 

गेल्या वर्षी मी ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये सहभागी झालो होतो. या मॅरेथॉनमधील सहभागाचा अनुभव आरोग्यदायी होता. युनिकेम लॅबोरेटरीज लिमिटेड या फार्मा कंपनीच्या माध्यमातून ग्रुपद्वारे आम्ही या वर्षीच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालो आहोत. माझ्या कर्मचाऱ्यांना आरोग्याबाबत सुदृढ राहण्याबाबत प्रोत्साहित करणे; ‘टीम बिल्डिंग’ अधिक सक्षमपणे करणे, असा त्यामागील उद्देश आहे. लोकांनी या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन आरोग्याबाबत सुदृढ राहण्याचा नववर्षातील संकल्प करावा.- संतोष क्षीरसागर, हेड एच आर, युनिकेम लॅबोरेटरीज लिमिटेड, कोल्हापूर.

 

 

टॅग्स :MarathonमॅरेथॉनLokmatलोकमतkolhapurकोल्हापूर