coronavirus: कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे सक्रिय पाच रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 12:01 IST2023-03-03T12:00:36+5:302023-03-03T12:01:15+5:30
नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज

coronavirus: कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे सक्रिय पाच रुग्ण
कोल्हापूर : गेल्या २४ तासांत कोरोनाचा नवा रुग्ण नोंदवण्यात आला असून जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या पाचवर गेली आहे. हा नवा रुग्ण राधानगरी तालुक्यातील आहे.
गतवर्षीपासून कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या घटत गेली. सर्व काही नियमितपणे सुरू असतानाच गेल्या आठवड्यापासून पुन्हा कोरोनाची लागण सुरू झाल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी संध्याकाळी आलेल्या अहवालानुसार राधानगरी तालुक्यातील एका व्यक्तीला कोराेनाची लागण झाली असून एकूण रुग्णसंख्या पाच आहे.
कोरोना महामारीनंतर आता कुठे अर्थव्यवस्था सुरळीत सुरु झाली आहे. यातच पुन्हा रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सध्या वातावरणातील बदलामुळे सर्दी, ताप, खोकल्याच्या आजारात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.