इचलकरंजीत जुन्या तीन मजली लाकडी इमारतीस आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 13:07 IST2021-04-13T04:24:24+5:302021-04-13T13:07:23+5:30
Fire Ichlkarnaji Kolhapur : इचलकरंजी येथील खंजिरे मळ्यामधील एका जुन्या तीन मजली लाकडी इमारतीस शॉर्टसर्किटने आग लागली. यामध्ये संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. अग्निशामक दलाच्या पाच गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. याबाबत नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत गावभाग पोलीस ठाण्यात सुरू होती.

इचलकरंजीत जुन्या तीन मजली लाकडी इमारतीस आग
इचलकरंजी : येथील खंजिरे मळ्यामधील एका जुन्या तीन मजली लाकडी इमारतीस शॉर्टसर्किटने आग लागली. यामध्ये संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. अग्निशामक दलाच्या पाच गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. याबाबत नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत गावभाग पोलीस ठाण्यात सुरू होती.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, भारत बिडकर व शंकर बिडकर यांची लाकडी तीन मजली इमारत आहे. या इमारतीचे नूतनीकरण सुरू असून, पंधरा दिवसांपूर्वी याच इमारतीस आग लागली होती. त्यावेळी अग्निशामक दलाने आग विझवून इमारतीतील वीज जोडणी नव्याने बसविण्यास सांगितले होते. त्यानुसार इमारतीचे दुरूस्ती काम सुरू होते. मात्र, सोमवारी पुन्हा आग लागली.