शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील शॉर्टसर्किटने राजाराम साखर कारखान्याला आग, सुमारे ५ कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 11:43 IST

आगीत तीन सिलेंडरचा स्फोट

कसबा बावडा : कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याला शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास आग लागली. या आगीत मशिनरी विभागातील काही मशिनरी, विद्युत उपकरणे व ऑइलचे टँक जळून खाक झाले. त्यामुळे कारखान्याचे सुमारे ४ ते ५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तब्बल दीड तासाच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली. शॉर्टसर्किटने ही आग लागली. घटनास्थळी कारखान्याचे चेअरमन आमदार अमल महाडिक तळ ठोकून होते. दोनच दिवसांपूर्वी कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता झाली होती.सकाळी साडेदहाच्या सुमारास ही आग लागली. सुरुवातीला ही आग कर्मचाऱ्यांनी विजवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग नियंत्रणाच्या पलीकडे गेली होती. काही वेळातच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. आग लागल्यानंतर थोड्याच वेळात तीन सिलिंडरचा एका पाठोपाठ स्फोट झाल्याने आगीचा भडका सर्वत्र मोठ्या प्रमाणात उडाला. काही क्षणातच आग दुसऱ्या मजल्यापर्यंत पसरली. दोनच दिवसापूर्वी राजाराम कारखान्याचा गळीत हंगाम संपल्याने कर्मचाऱ्यांची संख्या कमी त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही.गळीत हंगाम संपल्याने कारखान्याची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. कारखान्यात अनेक ठिकाणी बगॅस पडले होते. मोठ्या प्रमाणात सर्वत्र ऑइलही सांडले होते. काही ठिकाणी वेल्डिंगच्या साहाय्याने मशिनरी कट करण्याचे काम सुरू होते. हे काम सुरू असतानाच अचानक शॉर्टसर्किट झाले व जमिनीवर पडलेल्या ऑइल व बगॅसने पेट घेतला. मोठ्या प्रमाणात वायरिंगही जळू लागले. कोल्हापूर महापालिका अग्निशमन दलाच्या सहा गाड्यांसह वडगाव तसेच परिसरातील चार टँकर आग विझवण्यासाठी कार्यरत होते. शहर पोलिस उपाधीक्षक अजित टिक्के, प्र. पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी घटनास्थळी भेट दिली.

कारखान्यात काही मशीनचे पार्ट कट करण्याचे काम वेल्डिंगच्या साहाय्याने सुरू होते. अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागली. या आगीत सुमारे ४ ते ५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. - आमदार अमल महाडिक

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेfireआग