शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
5
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
6
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
7
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
8
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
9
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
10
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
11
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
12
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
13
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
14
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
15
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
16
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
17
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
18
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
19
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
20
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे

देवस्थान जमिनी कसणाऱ्यांचे खंड शिबिराद्वारे भरून घ्या - पालकमंत्री आबिटकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 15:19 IST

धोरणात्मक निर्णयांसाठी पाठपुरावा करू

कोल्हापूर : देवस्थानच्या जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांचे खंड तालुकानिहाय शिबिरे भरवून भरून घ्या, खंडाची पावती त्यांना मिळाली की ते अधिकृतरित्या जमिनी कसत आहेत, यावर शिक्कामोर्तब होईल. त्यामुळे कर्ज मिळणे सोपे होईल. पीएम किसान, नमो किसान योजना, आपत्तींमुळे नुकसान भरपाई, जमिनीच्या सातबाऱ्यावर शेतकऱ्यांचे नाव, या धोरणात्मक निर्णयांबाबत शासन दरबारी पाठपुरावा करू, अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारीतील जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, महसूल उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, उदय नारकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मंत्री आबिटकर म्हणाले, देवस्थानच्या जमिनींची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री केली जात होती. त्यामुळे पिढ्यान्पिढ्या जमीन कसणारे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे ही खरेदी-विक्री रोखणे आधी गरजेचे होते. महसूल मंत्र्यांनी त्याला मंजुरी दिल्याने या व्यवहारांना चाप बसेल. जिल्हाधिकारी येडगे यांनी खंड भरण्यासाठी शिबिरे घेतली जातील, असे सांगितले.

खंड भरण्यासाठी सर्व तालुक्यांमधील तहसील कार्यालयात शिबीर होणार आहे.तालुका : तारीख

  • राधानगरी, पन्हाळा : १९ व २० मे
  • गडहिंग्लज, चंदगड : २२ व २३ मे
  • आजरा, भुदरगड : २७ व २८ मे
  • करवीर : २९ व ३० मे
  • गगनबावडा : २ व ३ जून
  • हातकणंगले : ३ व ४ जून
  • शाहुवाडी : ३ व ४ जून
  • कागल, शिरोळ : ९ व १० जून
टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीguardian ministerपालक मंत्रीPrakash abitkarप्रकाश आबिटकर