शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

पूर्वीच्याच दराने वीज बिले भरून घ्या

By admin | Updated: December 9, 2014 23:23 IST

यंत्रमागधारक संघटनांची मागणी : महावितरण कंपनीला दिले निवेदन

इचलकरंजी : राज्य शासनाने वीज दरवाढ रोखण्यासाठी दिलेली अतिरिक्त ७०६ कोटी रुपये अनुदानाची रक्कम रद्द केल्याने यंत्रमाग उद्योजकांच्या वीज दरात असह्य वाढ झाली आहे. शासनाने पूर्ववत अनुदान द्यावे, यासाठी यंत्रमागधारक संघटना जोरदार प्रयत्न करीत आहेत. दरम्यानच्या काळात महावितरण कंपनीने पूर्वीच्याच दराने यंत्रमागांची वीज बिले भरून घ्यावीत, अशा आशयाचे निवेदन यंत्रमागधारक जागृती संघटनेने महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता आनंदराव शिंदे यांना दिले.अतिरिक्त वीज अनुदान रद्द केल्याने मागील नोव्हेंबर महिन्याची वीज बिले अधिक रकमेची आली आहेत. त्यामुळे यंत्रमागधारकांमध्ये खळबळ माजल्याने आज, मंगळवारी यंत्रमागधारक जागृती संघटना, एअरजेट विव्हर्स असोसिएशन व रूटी-सी पॉवरलूम संघटनेच्यावतीने महावितरण कंपनीचे अभियंता शिंदे यांना निवेदन दिले. यावेळी झालेल्या चर्चेत यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन म्हणाले, यंत्रमागधारकांना नुकतीच वाढीव दराची वीज बिले मिळाली आहेत. त्यांना भरण्यासाठी १२ डिसेंबर ही तारीख असून, पूर्वीच्याच दराने वीज बिले भरण्यास ताबडतोब मंजुरी मिळावी.यावेळी ऋषभ जैन, सतीश राठी, अशोक बुगड, कमल तिवारी यांनीही यंत्रमागधारकांच्यावतीने म्हणणे मांडले. त्यानंतर बोलताना अभियंता आनंदराव शिंदे यांनी, पूर्वीच्याच दराने वीज बिले भरून घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून मंजुरी देऊ, असे सांगितले. (प्रतिनिधी)संघटना गप्पच..अचानकपणे वाढीव दराची वीज बिले आल्याने गेले दोन दिवस येथे खळबळ उडाली आहे. अशा परिस्थितीमध्ये यंत्रमागधारकांचे कैवारी म्हणून कार्यरत असलेल्या इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशन, राष्ट्रवादी पॉवरलूम असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा पॉवरलूम असोसिएशन व पॉपलीन यंत्रमागधारक कृती समिती या संघटना अद्यापही मूग गिळून गप्प असल्याबद्दल यंत्रमागधारकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.