संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 23:00 IST2018-04-13T23:00:42+5:302018-04-13T23:00:42+5:30

आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Filed a FIR complaint against Sambhaji Bhide | संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल

संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल

बेळगाव : येळ्ळूर येथील महाराष्ट्र मैदानावर गुरुवारी झालेल्या सभेत प्रक्षोभक विधाने केल्याचा ठपका ठेऊन सांगलीच्या शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून बेळगाव पोलीस आयुक्तालयाने ही कारवाई केली आहे. या सभेत भिडे यांनी केलेली विधाने आचारसंहितेच्या कचाट्यात अडकली आहेत. संभाजी भिडे हे गुरुवारी येळ्ळूर येथे महाराष्ट्र मैदानात झालेल्या कुस्त्यांना उपस्थित होते. 
 
काय म्हणाले होते भिडे........
येळ्ळूरचे महाराष्ट्र मैदान देशातील एक अव्वल दर्जाचे मैदान आहे. हे मैदान उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या माजी आमदाराला त्याची जागा दाखवून द्या. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारालाच विजयी करुन मराठी बाणा दाखवा.

Web Title: Filed a FIR complaint against Sambhaji Bhide