उत्रे येथे शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:21 AM2020-12-09T04:21:23+5:302020-12-09T04:21:23+5:30

उत्रे (ता. पन्हाळा) येथे रस्त्याच्या वादातून शिक्षक संजय पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी भावकीतील अजित बाबासो पाटील व त्याच्या वडिलांना ...

Filed a case against the teacher at Utre | उत्रे येथे शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल

उत्रे येथे शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल

Next

उत्रे (ता. पन्हाळा) येथे रस्त्याच्या वादातून शिक्षक संजय पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी भावकीतील अजित बाबासो पाटील व त्याच्या वडिलांना मारहाण केली. याबाबतची तक्रार पन्हाळा पोलीस ठाण्यात नोंद झाली. अजित बाबूराव पाटील याचे स्वमालकीच्या शेतातून गट क्रमांक १३३ मधून जाणाऱ्या वाटेबाबत तेथील ग्रामपंचायत व संजय पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. वादाचे रूपांतर मारामारीत होऊन हा वाद विकोपास गेला. अजित व त्याचे वडील यांना काठी व फरशीने मारहाण केल्याने संजय, त्याची दोन मुले शुभम, सूरज, त्याचे वडील बळिराम व रितेश बळिराम पाटील यांनी मारहाण करून जखमी केल्याने पन्हाळा पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुर्वे करत आहेत.

Web Title: Filed a case against the teacher at Utre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.