शिवकुमारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:24 IST2021-04-02T04:24:07+5:302021-04-02T04:24:07+5:30
कोल्हापूर : वन विभागातील दीपाली चव्हाण यांनी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याने त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ...

शिवकुमारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
कोल्हापूर : वन विभागातील दीपाली चव्हाण यांनी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याने त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप महिला आघाडीने गुरुवारी केली. याबाबतचे निवेदन मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन यांना दिले.
यावेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गायत्री राऊत म्हणाल्या, वरिष्ठांनी तक्रारींकडे कानाडोळा केल्यामुळे दीपाली चव्हाण यांना आत्महत्येचा मार्ग पत्करावा लागला. इतके होऊनही विनोद शिवकुमार याला निलंबित करण्यासाठी वन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बराच वेळ घेतला, यामागचे गौडबंगाल काय, याचे स्पष्टीकरण मिळणे आवश्यक आहे. दीपालीची तक्रारपत्रे, कागदपत्रे व पुरावे वनविभागाने पोलिसांना देऊन विनोद शिवकुमारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. यावेळी आसावरी जुगदार, विद्या बनछोडे, स्वाती कदम, शुभांगी चितारे, कविता लाड, अरुणा घाडगे, कोमल देसाई उपस्थित होत्या.
---