बुरंबाळ येथे मारामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:24 IST2021-01-20T04:24:58+5:302021-01-20T04:24:58+5:30

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, बुरंबाळ गावात ग्रामपंचायत निवडणूक सुरू होती. येथे शिवसेना व जनसुराज्य पक्षाचे पॅनल उभे होते. फिर्यादी ...

Fights at Burambal | बुरंबाळ येथे मारामारी

बुरंबाळ येथे मारामारी

पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, बुरंबाळ गावात ग्रामपंचायत निवडणूक सुरू होती. येथे शिवसेना व जनसुराज्य पक्षाचे पॅनल उभे होते.

फिर्यादी मंगल बावधने हिची भावजय सुचिता बावधने हिचा निवडणुकीत पराभव झाला म्हणून शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. १८) रात्री ११ वाजता फिर्यादी मंगल बावधने हिच्या घरासमोर जाऊन शिवसेनेचे कार्यकर्ते लक्षमण बावधने, सखाराम कस्तुरे, दशरथ पाटील, संजय पाटील या चौघांनी तुम्ही आमच्या पार्टीला मतदान का केले नाही म्हणून काठीने मारहाण करून शिवीगाळ केली आहे, तर जनाबाई गणपती येडगे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे की, तुम्ही फटाके का वाजवले म्हणून राज कस्तुरे, जानू कस्तुरे, बाळू बावधने, मंगल बावधने, ताई बावधने या पाचजणांनी माझ्या गळ्यातील सत्तर हजार रुपये किमतीचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण तोडून काठीने मारहाण केली आहे, अशी फिर्याद पोलिसांत दिली आहे.

Web Title: Fights at Burambal