शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील भेंडवडेत दोन गटांत मारामारी, शस्त्राचा वापर; राजाराम कारखान्याच्या माजी अध्यक्षांना मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 12:19 IST

पेठवडगाव : भेंडवडे (ता. हातकणंगले) येथे पूर्ववैमनस्यातून दोन गटात मारहाण झाली. यामध्ये काठी आणि शस्त्राचा वापर करण्यात आला. मोपेड ...

पेठवडगाव : भेंडवडे (ता. हातकणंगले) येथे पूर्ववैमनस्यातून दोन गटात मारहाण झाली. यामध्ये काठी आणि शस्त्राचा वापर करण्यात आला. मोपेड पेटविण्यात आली असून मोटरसायकलची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत फिर्यादी नोंद झाल्या नव्हत्या. याबाबत भेंडवडे गावात तणावपूर्ण शांतता आहे.या वादाला ग्रामपंचायत निवडणुकीची पार्श्वभूमीवर आहे. प्रामुख्याने राजाराम साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने व अमोल निकम, बालाजी निकम यांच्यात वर्चस्ववादातून अंतर्गत धुसफूस होत होती.दरम्यान, गुरुवारी रात्री जाब विचारण्यावरून मारहाण झाल्याची फिर्याद पोलिसांत नोंद झाली होती. याप्रकरणी माने गटाच्या सहा जणांवर गुन्हा नोंद करण्यात आली होती. दरम्यान, या घटनेचे पडसाद आज, शुक्रवारी सकाळी उमटले दोन्ही गट आमनेसामने आल्याने दोन्ही गटांत वाद झाला.शुक्रवारी झालेल्या मारहाणीत निकम गटाच्या बालाजी निकम व संतोष निकम यांना मारहाण केली आहे. तसेच माने गटाचे प्रमुख व राजाराम साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने यांना मारहाण झाल्याचे समजते. त्यांच्यासह अन्य काही जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.या मारहाणीत काठ्या व शस्त्रांचा वापर झाला, तसेच मोपेड पेटविली असून दुसऱ्या गाडीवर दगड टाकून मोडतोड केली आहे. गावात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जयसिंगपूर विभागाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देत शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा नोंद झाली नव्हती. मात्र रात्री उशिरापर्यंत नोंद घेण्याचे काम सुरू होते. तपास पोलिस निरीक्षक भैरव तळेकर करत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस