शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांच्या खेळण्याच्या वादातून हाणामारी, दोघे जण ताब्यात; कोल्हापुरातील लाइन बझारमध्ये तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 12:10 IST

काही तरुणांनी पोलिसांच्या गाडीच्या दिशेने दगड फेकले; पण पोलिसांनी वेळीच त्यांना पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली.

कोल्हापूर : कसबा बावडा येथील लाइन बझारमधील शहाजीनगर येथे लहान मुलांच्या खेळण्याच्या वादातून मारामारी झाली. शिवजयंती उत्सव साजरा करणाऱ्या मंडळासमोर रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. मारहाण करणाऱ्या दोन तरुणांना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.शहाजीनगर (लाइन बझार) येथे शिवजयंतीनिमित्त राजे ग्रुपच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रविवारी रात्री महिला आणि तरुणी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होता. या परिसरात राहणारी दोन लहान मुले मंडळासमोर मातीत खेळत होते. धूळ उडत असल्यामुळे महिलांनी त्यांना दुसरीकडे खेळण्यास सांगितले; पण त्या मुलांनी घरात जाऊन नातेवाइकांना हा प्रकार सांगितल्यानंतर दोन तरुणांनी येऊन मंडळातील काही महिला आणि तरुणींना मारहाण केली.

मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मारामारीची माहिती पोलिस घटनास्थळी पोहोचले. काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी या परिसरात शीघ्र कृती दलासह पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. शहर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेश गवळी रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी होते.अधिकाऱ्यांनी परिस्थिती आणली नियंत्रणातदरम्यान, दोन्ही संशयितांना अटक करावी आणि माफी मागण्यास सांगावे, असा आग्रह धरत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्यासह इतर पोलिस अधिकाऱ्यांना घेराव घातला. पोलिसांनी तातडीने दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन पोलिस गाडीत बसविले. गाडी शाहूपुरी पोलिस ठाण्याकडे जात असताना काही तरुणांनी गाडीच्या दिशेने दगड फेकले; पण पोलिसांनी वेळीच त्यांना पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस