शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: प्रेमविवाहातून भादोलेत दोन गटात मारामारी, ९ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 16:55 IST

याप्रकरणी दोन्ही गटांतील १३ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला

पेठवडगाव : प्रेमविवाहावरून भादोले (ता. हातकणंगले) येथे दोन गटात मारामारीची घटना घडली. यामध्ये ९ जण जखमी झाले. मारहाणीत लोखंडी वस्तू, काठी, दगडाचा वापर करण्यात आला. याप्रकरणी दोन्ही गटांतील १३ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. परस्परांवर दोन्ही फिर्यादी दाखल झाल्या आहेत. ही घटना मंगळवारी( दि.१८) घडली.या मारहाणीत संजय विलास धनवडे, लक्ष्मी विलास धनवडे, प्रीती संजय धनवडे, विद्या संतोष धनवडे, मनीषा संजय धनवडे, छाया तानाजी धनवडे, पूजा अभिजीत कांबळे, शोभा शहाजी धनवडे, स्तुती शहाजी धनवडे (सर्व रा. भादोले ) अशी जखमींची नावे आहेत.पोलिसांत मिळालेल्या माहितीनुसार भादोले येथील संतोष धनवडे यांनी कुरुंदवाड येथील विद्या सोनावळे यांच्याबरोबर २५ मार्च रोजी विवाह केला होता. विद्या या कुरुंदवाड पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. पूजा करण्यासाठी हे नवदांपत्य भादोले येथे दहा दिवसांपासून राहत होते. दरम्यान, संतोष धनवडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भादोले येथील नातेवाइकाच्या मदतीने सोनावळे या मुलीचा शोध घेत संजय धनवडे यांच्या घरी आल्या. यावेळी सोनावळे यांनी फिर्यादी धनवडे यास शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. तर अन्य सोबतच्या नातेवाइकांपैकी काहींनी लोखंडी वस्तू, दगड, काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच नववधू विद्या हिला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सुजाता महावीर सोनावळे (रा. कुरुंदवाड), तुषार तानाजी धनवडे, शहाजी महादेव धनवडे, शोभा शहाजी धनवडे, शोभा तानाजी धनवडे (सर्व रा. भादोले), पूजा अभिजीत कांबळे (रा. कोरेगाव, ता. वाळवा) यांच्यावर गुन्हा नोंद झाला.सुजाता सोनावळे यांनी दिलेल्या फिर्यादीत मुलगी विद्या यांची भेट घेण्यास विरोध केला. यावेळी धनवडे यांच्या नातेवाइकांनी मारहाण केली. या प्रकरणी संतोष संजय धनवडे, संजय विलास धनवडे, लक्ष्मी विलास धनवडे, मनीषा संजय धनवडे, प्रीती संजय धनवडे, ज्योती राहुल धनवडे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस