पंधरा लाखांचे सोने घेऊन परप्रांतीय कारागीर पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:26 AM2021-01-20T04:26:06+5:302021-01-20T04:26:06+5:30

कोल्हापूर : सोन्याचे दागिने बनविण्यासाठी दिलेले सुमारे १५ लाख रुपयांचे ३०० ग्रॅम चोख सोने घेऊन परप्रांतीय कारागीर पसार झाल्याची ...

Fifteen lakhs of foreign artisans carrying gold | पंधरा लाखांचे सोने घेऊन परप्रांतीय कारागीर पसार

पंधरा लाखांचे सोने घेऊन परप्रांतीय कारागीर पसार

Next

कोल्हापूर : सोन्याचे दागिने बनविण्यासाठी दिलेले सुमारे १५ लाख रुपयांचे ३०० ग्रॅम चोख सोने घेऊन परप्रांतीय कारागीर पसार झाल्याची घटना गुजरीत घडली. या प्रकरणी फसवणूक झाल्याची तक्रार कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप सुरेश गायकवाड यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली. याबाबत संशयित कारागीर शंभू कार्तिक बेरा (वय ३२, रा. पूरबा मेदीनीपूर, वेस्ट बंगाल) याच्यावर पोलिसांत गुन्हा नोंदवला.

शहरातील गुजरीत आर. डी. कॉम्प्लेक्समध्ये कुलदीप गायकवाड यांचे ज्वेलरीचे दुकान आहे. गेली १० वर्षे गायकवाड हे शंभू बेरा या कारागिराकडे चोख सोने देऊन त्याच्याकडून दागिने बनवून घेतात. सोमवारी (दि. १०) दुपारी गायकवाड यांनी नेहमीप्रमाणे कारागीर शंभू बेरा याच्याकडे सोन्याचे दागिने बनवून घेण्यासाठी १५ लाख रुपये किमतीचे सुमारे ३०० ग्रॅम चोख सोने दिले. त्यानंतर ते सोने घेऊन कारागीर बेरा याने पलायन केल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी गायकवाड यांच्या पत्नी श्वेता गायकवाड यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली. त्यानुसार कारागिरावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

Web Title: Fifteen lakhs of foreign artisans carrying gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.