शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात महिला पोलिस उपनिरीक्षकास सराईत गुन्हेगाराकडून धक्काबुक्की, संशयित सूरज नलवडे याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 13:40 IST

गणेश आगमन मिरवणुकीतील प्रकार 

कोल्हापूर : गणेश आगमन मिरवणुकीत जनता बाजार चौकातून पुढे जाण्यास सांगितल्याच्या रागातून सराईत गुन्हेगार सूरज तानाजी नलवडे (वय ३३, रा. शाहूनगर, कोल्हापूर) याने पोलिस उपनिरीक्षक रूपाली भीमराव पवार यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. ही घटना शनिवारी (दि. ७) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. याबाबत उपनिरीक्षक पवार यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी नलवडे याला अटक केली.अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागात नियुक्ती असलेल्या उपनिरीक्षक पवार या सहकाऱ्यांसह जनता बाजार चौकात बंदोबस्तासाठी तैनात होत्या. शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास कीर्ती तालीम मंडळाचा गणपती मिरवणुकीतून जनता बाजार चौकात पोहोचला. बराच वेळ एकाच ठिकाणी रेंगाळलेल्या मंडळांना पुढे सरकण्याच्या सूचना पोलिसांकडून दिल्या जात होत्या. त्यावेळी उपनिरीक्षक पवार यांनी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना वाहन पुढे घेण्यास सांगितले.याचा राग आल्याने सराईत गुन्हेगार सूरज नलवडे याने पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी वाद घातला. 'असले पोलिस अधिकारी लय बघितलेत. मी पुढे जात नाही. काय करायचं ते करा,' असे म्हणत त्याने पोलिसांना धक्काबुक्की केली. सार्वजनिक ठिकाणी पोलिसांच्या अंगावर हात उगारल्याबद्दल उपनिरीक्षक पवार यांनी नलवडे याच्या विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची दोन दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी झाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस