शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हलकर्णी येथे स्त्री जातीचे अर्भक सापडले, कोल्हापूरच्या शिशुगृहात पाठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 13:36 IST

दैव बलवत्तर म्हणूनच परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर असूनही ‘ती’ सुरक्षित सापडली.

हलकर्णी : येथील मुंगूरवाडी यांच्या जनावरांच्या गोठ्याजवळील बोळात गुरुवारी पहाटे स्त्री जातीचे नवजात अर्भक प्लास्टिक पिशवीमध्ये सापडले. त्यामुळे हलकर्णी पंचक्रोशीत खळबळ उडाली असून याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. नवजात अर्भकाला कोल्हापूर येथील शिशूगृहात दाखल करण्यात आले आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गुरुवारी पहाटे सहाच्या सुमारास नितीन मुंगूरवाडी यांच्या जनावरांच्या पत्र्याच्या गोठ्यालगत असणाऱ्या बोळात बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. त्यामुळे शेजारी राहणारे राजेंद्र नावलगी यांनी जाऊन पाहिले असता प्लस्टिक पिशवीत अर्भक आढळून आले. पाठीला मुंग्या लागल्यामुळे ते रडत होते.सरपंच योगिता संगाज यांनी त्या अर्भकाला हलकर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी नीलिमा धबाले यांनी प्राथमिक तपासणी करून अर्भकाला उपजिल्हा रुग्णालयाकडे पाठविले. तेथून त्याला शिशुगृहात पाठवण्यात आले. दरम्यान, सरपंच संगाज यांच्यासह असगर बागवान, रामा सुतार, महावीर वड्राळे आदींनी अर्भकाची काळजी घेतली. राजेंद्र नावलगी यांच्या वर्दीवरून घटनेची पोलिसात नोंद झाली आहे.गोंडस अर्भक सुखरूप!२ किलो ७०० ग्रॅम वजनाचे अर्भक गोंडस व सुखरूप आहे. नाळेसह प्लास्टिक पिशवीत घालून उताणे झोपवल्यामुळे पाठीला मुंग्या लागून ते रडत होते. लता वड्राळे, संगीता नावलगी, परवीन पानारी, दीपा चिटणीस यांनी तत्काळ अंघोळ घालून मधाचे बोट चाटवले. त्यानंतर अर्भकाला प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठवण्यात आले.‘तिचे’ नशीबच बलवत्तर..!कदाचित मुलगी झाली म्हणूनच तिला असे टाकून देण्यात आले होते. परंतु, केवळ दैव बलवत्तर म्हणूनच परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर असूनही ‘ती’ सुरक्षित सापडली. अर्भकाच्या मातेसह तिला टाकून देणा-या अज्ञातांचा पोलिस शोध घेत आहेत.

पालनपोषणासाठी दाम्पत्य पुढेमुंगुरवाडीतील नीलेश व दीपा चिटणीस या दाम्पत्याने ‘त्या’ अर्भकाच्या पालनपोषणाची जबाबदारी घेण्याची तयारी दाखवली आहे. मात्र, त्यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस